Satyaprem Ki Katha Box Office Collection  Esakal
मनोरंजन

Satyaprem Ki Katha BO: सत्यप्रेम की 'कथा' प्रेक्षकांना भलतीच आवडली! कमावले 'इतके' कोटी

Vaishali Patil

Satyaprem Ki Katha BO: गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर तीन ते चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यातच '72 हुरें' आणि 'नियत' या चित्रपटांचाही सामावेश होता. मात्र या चित्रपटांना प्रेक्षकांची फारशी पसंती मिळालेली नाही.

त्यातच मराठी बॉक्स ऑफिसवर 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची हवा आहे. तर हिंदी भाषेत 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

पुन्हा एकदा कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खुप आवडली. त्यांच्या रोमान्सची जादू मोठ्या पडद्यावर चालली आहे. कार्तिक आणि कियाराचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट प्रेक्षकांना खुपच आवडला.

त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवरच्या कमाईच्या आकड्यांवर झाला आहे. त्यातच आता 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे. 100 कोटींची कमाई करत 2023 चा चौथा हिट चित्रपट ठरला आहे.

सोमवारी कार्तिक-कियारा यांच्या 'सत्यप्रेम की कथा'ने जगभरात 100 कोटींचा टप्पा पार केला. आता हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरही नॉट आउट शतक ठोकण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी या चित्रपटाने एकाच दिवशी एकूण 2.14 कोटींची कमाई केली आहे.

'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाच्या देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर कमाईवर नजर टाकली असता त्याने 70.2 कोटींचा गल्ला जमावला आहे. त्यामुळे हा चित्रपट कासवाच्या गतीने का हाईना देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमावण्यात यशस्वी ठरेल असं बोललं जात आहे.

सत्यप्रेम की कथा 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. भूल भुलैया 2 च्या हिटनंतर नंतर पुन्हा एकदा कार्तिक कियाराच्या कमाल केली आहे.

साजिद नाडियादवाला निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीशिवाय सुप्रिया पाठक, शिखा तलसानिया, रितू शिवपुरी, गजराज राव यांसारखे कलाकारही यात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT