sayali sanjeev play saibai bhosle historical role in har har mahadev movie nsa95 sakal
मनोरंजन

Sayali Sanjeev: सायली साकरतेय महाराणी सईबाई.. ऐतिहासिक भूमिकेचे आव्हान!

यंदाची दिवाळी होणार शिवमय, देशभरात होणार शिवगर्जना..

नीलेश अडसूळ

har har mahadev movie: महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभूंवर चित्रीत करण्यात आलेला 'हर हर महादेव' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील दमदार गाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व रसिकप्रेक्षकांची या गाण्यांना उत्तम दाद मिळत आहे. शिवाय या चित्रपटाचा टिझर देखील प्रदर्शित झाला असून त्यातील राज ठाकरे यांचा आवाज आणि संवाद प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहेत. या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी म्हणजे, अभिनेत्री सायली संजीव (sayali sajeev) या चित्रपटात अत्यंत महत्वाची अशी ऐतिहासिक भूमिका साकारत आहे.

(sayali sanjeev play saibai bhosle historical role in har har mahadev movie)

याआधी कधीच न झालेला असा प्रयोग 'हर हर महादेव' या चित्रपटाद्वारे करण्यात आला असून हा सिनेमा फक्त मराठीतच नाही तर पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुलतानी अंधार पसरलेला असताना मा जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या रणझुंजार कर्तृत्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार असून अत्यंत तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली आहे.

झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. यामध्ये हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे तर वीर योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत अभिनेता शरद केळकर तर बाजीप्रभूंच्या पत्नीच्या भूमिकेत अमृता खानविलकर आहे. एवढी दमदार कास्ट समोर आल्यानंतर इतर कलाकारांबद्दल ही जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. अशातच आज एक पोस्टर सायलीसह चित्रपटाच्या सर्व टीमने शेअर केले. ज्यामध्ये सायली संजीव अत्यंत महत्वाच्या भूमिकेत असल्याचे दिसले.

छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी महाराणी सईबाई भोसले यांची भूमिका सायली साकारणार आहे. या भूमिकेच्या निमित्ताने सायली पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. अत्यंत पारंपरिक आणि शाही पोषाखात सायलीचा लूक समोर आला आहे. सोबत एक कॅप्शनही दिले आहे.

'मनातील दु:ख चेहऱ्यावर न दाखवता नेहमी स्मित हास्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी ‘महाराणी सईबाई भोसले’. त्यांच्या भूमिकेत अभिनेत्री सायली संजीव. लढण्यासाठी लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या शिवमंत्राचा आवाज संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार... येत्या दिवाळीत, २५ ऑक्टोबरपासून 'हर हर महादेव' मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला येणार.' असे सायलीने पोस्ट मध्ये म्हंटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

Ahmadpur Crime : अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात पिता पुत्राचा अज्ञात हल्लेखोरांकडून निर्घुन खून

Maharashtra Police : श्रीशैल्य चिवडशेट्टी बारामतीचे नवीन पोलिस निरिक्षक

Eknath Khadse : खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीचा पर्दाफाश! आंतरराज्यीय टोळीचा सहभाग, सोने घेणारा सराफ अटकेत

निशिगंधा वाड यांची लेक अभिनय क्षेत्रात येणार? दीपक देऊळकर म्हणाले, 'माझी मुलगी गोल्ड मेडलिस्ट पण...

SCROLL FOR NEXT