scam 2003 bharat jadhav in special role astitva marathi natak abdul karim telgi story  SAKAL
मनोरंजन

Scam 2003 मधल्या भुमिकेचा आणि नवीन नाटकाचा काय संबंध? भरत जाधव यांनी स्वतःच केला खुलासा

अब्दुल करीम तेलगी घोटाळा उघडकीस आणणाऱ्या Scam 2003 मध्ये भरत जाधव साकारणार ही भुमिका

Devendra Jadhav

Scam 2003: भरत जाधव हा मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांचा लाडका अभिनेता. भरतने आजवर विविध भुमिकांमधुन प्रेक्षकांना खळखळुन हसवलं. भरत आता लवकरच स्कॅम 2003 या आगामी वेबसिरीजमधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भरत जाधव यांच्या भुमिकेची छोटीशी झलक स्कॅम 2003 मध्ये दिसली. या वेबसिरीज मध्ये कोणती भुमिका साकारणार, याविषयी भरत जाधव यांनी स्वतःच खुलासा केलाय.

स्कॅम 2003 बद्दल बोलताना भरत जाधव सांगतात...

भरत जाधव स्कॅम 2003 बद्दल खुलासा करताना सांगतात, ‘3 लाख’ असं बोलताना मी ट्रेलर मध्ये दिसतोय. ‘scam’ या universe मधील ‘अब्दुल करीम तेलगी’ याच्या कथानकात मी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिकेत आपल्यासमोर येतोय. तेव्हा नक्की बघा, “scam 2003, the telgi story” १ सप्टेंबर पासून, sony liv वर."

भरत जाधव पुढे सांगतात, "बरं.. या ‘३ लाखांचा’ reference अजून एका वेगळ्या घटनेत पण येतोय. ती घटना बघण्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल.. ‘अस्तित्व’
लवकरच रंगभूमीवर.. नव्या भूमिकेत.. नविन नाटकासह..आपलं प्रेम व आशीर्वाद सदैव सोबत राहू द्या."

भरत जाधवचं नवीन नाटक

भरत जाधवने काही दिवसांपुर्वी नवीन नाटकाबद्दल पोस्ट करुन सांगितलंय की, "रसिक प्रेक्षकहो, आपणा सर्वांच्या आशीर्वादाने सही रे सही ला आज २१ वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या लाडक्या भरतने मागील ३० वर्ष आपणा सर्वांना खळखळून हसवल्यानंतर तो आपल्यासमोर पुन्हा येत आहे.

पण यंदा हसवायला नाही तर आपल्याला हळव करायला.. नवं नाटक घेऊन.. कधीही न पाहिलेल्या नव्या भूमिकेत.. भरत जाधव एंटरटेनमेंट अस्तित्व."

अशाप्रकारे भरत जाधव अस्तित्व या नाटकातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत

Scam 2003 मध्ये मराठी कलाकरांची मांदियाळी

अब्दुल करीम तेलगीच्या भारतातील सर्वात मोठ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची कहाणी, ज्याने देशाला त्याच्या अकल्पनीय प्रमाणाने धक्का दिला. Scam 2003 या शो चा ट्रेलर रिलिज झाला असून या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. इतकंच नव्हे तर प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे या ट्रेलर मध्ये अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकार दिसत आहेत. अभिनेता शशांक केतकर, निखिल रत्नपारखी, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी आणि प्रेक्षकांचा लाडका भरत जाधव देखील या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

Navodaya Vidyalaya Admission: नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाचे ऑनलाइन अर्ज सुरु; जाणून घ्या कसा आणि कुठे करावा

नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण' सिनेमाच्या टीझरची चर्चा; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT