seema deo passed away ashok saraf tribute to seema deo death SAKAL
मनोरंजन

Seema Deo: "ती माझ्या मोठ्या बहिणीसमान", सीमा देव यांच्या निधनाबद्दल अशोक सराफ वाहिली श्रद्धांजली

अशोक सराफ यांनी सीमा देव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय

Devendra Jadhav

Seema Deo Passed Away News: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सीमा देव यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालंय. सीमा देव यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केलीय. अशातच मनोरंजन विश्वातील सर्वांचे लाडके अशोक मामा म्हणजेच अशोक सराफ यांनी सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अशोक सराफ यांनी वाहिली श्रद्धांजली

अभिनयाची जाण असलेली देखणी शालीन नटी गेली, पहिल्या रोल पासून नाव केलं होतं, मराठी सिनेसृष्टी त्यांनी गाजवली, स्वभावाने छान, मला तर मोठ्या बहिणी समान मानत होतो., अशा शब्दात अशोक सराफ यांनी सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अल्झायमर आजाराने ग्रस्त सीमा देव

81 वर्षीय अभिनेत्री सीमा देव यांनी त्यांच्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या अल्झायमर या आजाराने ग्रस्त होत्या. ‘सरस्वतीचंद्र’ (1968), ‘आनंद’ आणि ‘ड्रीम गर्ल’ (1977) या हिंदी चित्रपटांमध्येही सीमा देव यांनी काम केले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास सुरु झाला होता. सीमा यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत आई लवकर बरी होऊ दे यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं होतं. गेल्या काही काळापासून सीमा त्यांच्या मुलासोबत मुंबईतील वांद्रे येथे राहत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT