basu chaterjee
basu chaterjee 
मनोरंजन

ज्येष्ठ दिग्दर्शक बासू दा अनंतात विलीन; चित्रपटसृष्टी हळहळली

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई ः मध्यमवर्गीयांचे स्वप्न चंदेरी पडद्यावर साकारणारे आणि बासू दा नावाने ओळखले जाणारे ज्येष्ठ दिग्दर्शक बासू चटर्जी आज अनंतात विलिन झाले. आज सकाळी सकाळी सांताक्रुझ येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले होते. दुपारी त्यांच्या पार्थिवावर पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

रजनीगंधा, छोटी सी बात,  बातो बातो मे, चितचोर, मंझिल, प्रियतमा अशा एकापेक्षा एक सुंदर कलाकृती देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक व पटकथा लेखक बासू चॅटर्जी मृत्यूसमयी 90 वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. काही कलाकारांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत बासू चॅटर्जी यांना बासू दा या प्रेमळ नावाने ओळखत असत. त्यांच्या निधनाची बातमी आज सोशल मीडियावर आयएफटीडीएच्या अशोक पंडित यांनी दिली. त्यांच्या भनिधनामुळे आणखीन एक धक्का हिंदी चित्रपटसृष्टीला बसला आहे. बासू चॅटर्जी यांनी हलकेफुलके आणि सरळ व साधे कथानक असलेले चित्रपट बनविले. देव आनंद, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना, अमोल पालेकर, शबाना आझमी, मौसमी चॅटर्जी, विद्या सिन्हा अशा अनेक कलाकारांबरोबर त्यांनी काम केले. हिंदी व बंगाली चित्रपटांबरोबरच त्यांनी ब्योमकेश बक्षी आणि रजनी या टीव्ही मालिकांचेही दिग्दर्शन केले. गेले काही दिवस ते आजारी होते आणि सकाळी त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. बासू दा यांना फिल्म फेअर आणि 1992 मध्ये दुर्गासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.  त्यांची मुलगी रुपाली गुहा या दिग्दर्शिका आहेत. त्यांनी नारबाची वाडी हा मराठी चित्रपट बनविला होता. 


बासू चॅटर्जी यांना कलाकारांनी वाहिलेली श्रद्धांजली

शांत, सभ्य , मृदू भाषी  असे बासू बॅनर्जी यांचे व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या चित्रपटांनी मध्यमवर्गीय समाजाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या सोबत मंझिल चित्रपट केला. या चित्रपटातील रिमझिम गिरे सावन या गाण्याच्या निमित्ताने त्यांची आठवण येते. त्यांच्या जाण्याचे हिंदी चित्रपटसृष्टीने नुकसान झाले.  त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना..
- अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते.
......
बासू चटर्जी यांचे निधनाची बातमी ऐकून खूप वाईट वाटले. मध्यमवर्गीयांचे जीवन हिंदी चित्रपटाद्वारे त्यांनीच पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर साकारले. स्वामी, अपने पराये आणि जीना यहां असे एकूण तीन चित्रपटात काम त्याच्या सोबत करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजते.
-  शबाना आझमी, ज्येष्ठ अभिनेत्री
....
मी माझ्या करिअरची सुरुवात बासू दा यांच्याबरोबर केली. सहायक दिग्दर्शक म्हणून मी बंगाली टीव्ही मालिका केली. तेव्हा त्यांच्या सोबत मी दिल्लीला शूटिंगसाठी गेलो. आजही तो दिवस मला आठवतो. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो
- सुजित सरकार, दिग्दर्शक
....
बासू चॅटर्जी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. त्यांना हलकेफुलके मनोरंजन करणारे चित्रपट बनविले. त्यांचे चित्रपट कायम स्मरणात राहतील. ओम शांती
- मधुर भांडारकर, दिग्दर्शक
...
बासू चॅटर्जी यांनी मध्यमवर्गीय माणसांची स्वप्ने तसेच त्यांची सुख-दुःखे पडद्यावर मांडली. सामान्य माणसाची कथा त्यांच्या चित्रपटात होती. त्यांचे चित्रपट कायम स्मरणात राहतील
- राज बब्बर, ज्येष्ठ अभिनेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT