Samantha Ruth Prabhu Sakal
मनोरंजन

Shakuntalam Hindi Trailer: शकुंतला बनून समंथाने लुटली चाहत्यांची मने

काही दिवसांपूर्वी समंथाच्या 'शाकुंतलम' या पौराणिक चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली होती. त्यानंतर आता तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

यशोदा नंतर, समंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा पडद्यावर तिच्या नवीन अवतारासह चाहत्यांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या 'शाकुंतलम' चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या 'शाकुंतलम' या पौराणिक चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली होती. त्यानंतर आता तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे.

समंथा रुथ प्रभूचा हा तेलगू चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. हिंदीत नुकताच प्रदर्शित झालेल्या या छोट्या ट्रेलरने चाहत्यांची आणि प्रेक्षकांची उत्सुकता द्विगुणित केली आहे.

हा 2 मिनिट 52 सेकंदाचा हिंदी ट्रेलर अगदीच अप्रतिम आहे. ट्रेलरची सुरुवात छोट्या शकुंतलाच्या जन्मापासून होते, जिला तिचा जन्म होताच तिच्या पालकांनी सोडून दिले होते. तिचा जन्म ऋषी विश्वामित्र आणि स्वर्गातील अप्सरा मेनका यांच्या प्रेमसंबंधातून झाला आहे. शकुंतला अनाथ दिसल्यावर ऋषी कण्व तिची काळजी घेतात.

एके दिवशी राजा दुष्यंत त्याच्या साथीदारांपासून विभक्त होऊन जंगलात जातो आणि तिथे त्याला शकुंतला दिसते आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होतात. त्यानंतर दोघेही जंगलातच लग्न करतात. त्यांचे प्रेम वाढत जाते आणि राजा दुष्यंत शकुंतलाला वचन देतो की तो नक्कीच परत येईल. दरम्यान, शकुंतलालाही तिची आई ज्या प्रसंगातून गेली होती अशाच प्रसंगातून तिला जावे लागले हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

एकीकडे शकुंतलाच्या व्यक्तिरेखेत समंथा एकदम परफेक्ट दिसते. तर दुसरीकडे, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनची 6 वर्षांची लाडकी मुलगी अल्लू आरहा देखील ट्रेलरमध्ये दिसली आहे, तिच्या निरागसतेमुळे चाहते तिचे कौतुक करत आहे. काही वेळापूर्वी रिलीज झालेल्या या ट्रेलरला 1 लाख 81 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून लोक समंथावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

शाकुंतलमच्या रिलीजच्या तारखेबद्दल बोलायचे तर, चित्रपट आधी नोव्हेंबर 2022 मध्ये रिलीज होणार होता, परंतु चित्रपटाच्या VFX आणि हिंदी रिलीजमुळे, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवण्यात आली. आता समंथा रुथ प्रभूचा चित्रपट 17 फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. तमिळ आणि तेलगू व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदीतही त्याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे. या चित्रपटात समंथासोबत देव मोहन मुख्य भूमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची अधिकृत विक्री सुरू; मुंबईतील Apple Store बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

SCROLL FOR NEXT