Samantha Ruth Prabhu Shaakuntalam movie
मनोरंजन

Shaakuntalam: समंथा स्टारर चित्रपटाचा पहिला लूक उद्या रिलीज होणार

सकाळ डिजिटल टीम

समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) प्रेम गाथा 'शाकुंतलम' (Shaakuntalam) मधील फर्स्ट-लूक सोमवारी रिलीज होणार आहे.

याची घोषणा करताना, निर्मात्यांनी लिहिले, "शाकुंतलमचा बहुप्रतिक्षित पहिला लूक २१ फेब्रुवारीला सकाळी 9:30 वाजता प्रदर्शित होणार आहे. समंथाच्या सोशल मिडीया हँडल्सशी टचमध्ये रहा".

समंथा, जिने पूर्वी सांगितले होते की तिला पौराणिक कथा, कालखंडातील नाटके आणि राजे आणि राण्यांच्या जगाचे नेहमीच वेड आहे, ती आता गुण सेखरच्या दिग्दर्शनात ती राणी शकुंतला देवीची (Guna Sekhaar) भूमिका करत आहे. (Shaakuntalam movie release)

'शाकुंतलम' ही शकुंतला आणि दुष्यंत यांच्या महाकाव्य प्रेमकथेवर आधारित आहे, जे महाभारतातील 'आदी पर्वा' चे रूपांतर आहे. देव मोहन 'शाकुंतलम' मध्ये राजा दुष्यंताच्या भूमिकेत आहे, तर अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अर्हा (Allu Arjun's Daughter Allu Arha) ही राजकुमार भरतच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता कबीर दुहान सिंग (Kabir Duhan Singh) आगामी महाकाव्य नाटकात राजा असुराच्या भूमिकेत दिसणार आहे.

नीलिमा गुणा (Neelima Guna) निर्मित, पौराणिक चित्रपटात VFX टेक्नोलॉजी आहे. निर्माते पोस्ट-प्रॉडक्शन औपचारिकता लवकरच पूर्ण करण्यास उत्सुक आहेत. 'शाकुंतलम' हा समंथाचा पहिला पौराणिक चित्रपट आहे. 'शाकुंतलम'साठी सेखर व्ही जोसेफ हे सिनेमॅटोग्राफर आहेत, तर प्रवीण पुडी हे संपादन सांभाळत आहेत. मणि शर्मा साउंडट्रॅक आणि बॅकग्राउंड स्कोअर तयार करणार आहेत. चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Pune Case: ‘बिग बॉस फेम’ दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ६५ वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून काठ्या-बेल्टने मारहाण, प्रकरण काय?

Konkan Railway: मुंबई-गोवा प्रवासासाठी कोकण रेल्वेचा नवा पर्याय, विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक आणि थांबे

जयगड-चिपळूण-सातारा महामार्गाला वेग, ९८ किलोमीटरच्या मार्गाच्या अहवालाची प्रक्रिया; सल्लागार नियुक्तीसाठी निविदा

'आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या'; बीडच्या ZP शाळेतील मुलींची रिपोर्टिंग करत मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

Latest Marathi News Live Update : गंगा एक्स्प्रेसवेवर पाणीच पाणी; आमदारांची गाडी अपघातग्रस्त

SCROLL FOR NEXT