5 South actresses we wish were cast opposite Shah Rukh Khan  esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan : नयनतारानंतर आणखी पाच अभिनेत्रींना शाहरुखसोबत काम करण्याची इच्छा! कोण आहेत त्या?

एकीकडे नयनतारानं दिग्दर्शक अॅटलीवर नाराजी व्यक्त केली असताना दुसरीकडे पुन्हा नव्या पाच अभिनेत्रींनी बॉलीवूडमध्ये यायचं आहे

युगंधर ताजणे

5 South actresses we wish were cast opposite Shah Rukh Khan : जवानच्या मोठ्या यशानंतर आता शाहरुखसोबत साऊथमधील आणखी पाच अभिनेत्रींनी किंग खानच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. एकीकडे नयनतारानं दिग्दर्शक अॅटलीवर नाराजी व्यक्त केली असताना दुसरीकडे पुन्हा नव्या पाच अभिनेत्रींनी बॉलीवूडमध्ये यायचं आहे.(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

अॅटली दिग्दर्शित जवाननं बॉक्स ऑफिसवर सातशे कोटींची कमाई केली आहे. अजूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. जवानच्या मोठ्या यशानंतर अॅटलीनं त्याचा आगामी काळात सिक्वेल येणार असल्याचे सांगितले होते. शाहरुखनं पहिल्यांदाच त्याच्या चित्रपटामध्ये एवढया मोठ्या प्रमाणात साऊथच्या कलाराकारांना सहभागी करुन घेतले होते.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर

जवानमध्ये प्रियामणि, नयनतारा, विजय सेतुपति, यांच्या मुख्य भूमिका होत्या. याशिवाय संगीतकार म्हणून अनिरुद्ध होता. फाईट मास्टरमध्येही दाक्षिणात्य कलाकारांचा समावेश होता. अशातच आता आणखी पाच अभिनेत्रींनी देखील शाहरुखसोबत काम कऱण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामध्ये सध्याच्या घडीच्या टॉपच्या अभिनेत्रींची नावं आहेत. त्यांच्या नावाला मिळणारा प्रतिसाद आणि त्यांचा फॅन फॉलोईंगही मोठा असल्याचे दिसून आले आहे.

नयनतारानं शाहरुखच्या जवानमध्ये नर्मदा नावाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. तर प्रियामणिनं लक्ष्मी नावाची व्यक्तिरेखा निभावली होती. शाहरुख खान हा आझाद नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होता. यानंतर शाहरुख हा राजकुमार हिरानी यांच्या डंकी नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या एका वृत्तानुसार आता साऊथमधील त्या पाच अभिनेत्री शाहरुखसोबत भूमिका करण्यास उत्सुक आहेत.

यामध्ये साई पल्लवी, पार्वती थिरवोत्तु, रश्मिका मंदाना, त्रिशा आणि श्रिया सरन अशी त्या अभिनेत्रींची नावं आहेत. त्यामध्ये त्यांना शाहरुखच्या कोणत्या चित्रपटामध्ये आपल्या त्या भूमिका करायला आवडल्या असत्या याबाबतची माहिती पुढे आली आहे. जसे की, साई पल्लवीला स्वदेशमधील गीताची भूमिका साकारायला आवडेल. तर पार्वतीला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेमधील सिमरनची भूमिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT