Shah Rukh Khan And Ananya Panday Controversy  esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan Ananya Panday : 'शाहरुख खान, अनन्या पांडेवर गुन्हा दाखल करा'! कॉग्रेसच्या प्रवक्त्याकडून कारवाईची मागणी, काय आहे कारण?

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची लेक अनन्या पांडे हे अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan And Ananya Panday Controversy : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची लेक अनन्या पांडे हे अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या विरोधात कॉग्रेसच्या एका प्रवक्त्यानं मुंबई पोलिसांना निवेदन दिले असून त्यात शाहरुख आणि अनन्यावर गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे.

कॉग्रेसच्या त्या प्रवक्तत्याचे नाव राकेश शेट्टी असे असून त्यांनी शाहरुख आणि अनन्याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्या निवेदनाद्वारे केली आहे. त्याचे मुख्य कारण अंबानी परिवाराची बर्थ डे पार्टी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावरुन वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे.

Money and Mind पैसा हवाच पण मनाची श्रीमंती-समाजऋणाचे भानही हवे!

शाहरुख आणि अनन्यानं वन्यजीव सुरक्षितता या नियमाचे उल्लंघन केल्याचे शेट्टी यांचे म्हणणे आहे. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये अनंत अंबानी हे एक साप शाहरुखच्या हातात देत असताना दिसत आहे. शाहरुखनं तो साप हातात घेत फोटोसाठी पोझ दिल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दुसऱ्या फोटोंमध्ये अनन्या पांडेनं देखील एक सर्प हातात घेत फोटो शेयर केला आहे.

Shah Rukh Khan And Ananya Panday Controversy

त्या व्हिडिओ आणि फोटोंवरुन वेगळ्याच वादाला सुरुवात झाली असून त्यावर काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कॉग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी मुंबई पोलिसांकडे संबंधित सेलिब्रेटींविरोधात एफआयआर दाखल करावी असे म्हटले आहे. त्या तक्रारीत म्हटल्या नुसार, शाहरुख खान, अनन्या पांडे तसेच अनंत अंबानी, इशा अंबानी आणि शनाया कपूर यांनी सापांसोबत केलेली ती कृती गैर आहे. त्यामुळे त्यांच्यावर वन्यजीव सुरक्षा अधिनियम कायदा २०२२ नुसार कारवाई करण्यात यावी. असे शेट्टी यांनी म्हटले आहे. या

१८ नोव्हेंबर रोजी मुंबईतील बीकेसी येथे इशा अंबानीच्या मुलांच्या बर्थ पार्टी निमित्तानं बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते. यावेळी किंग शाहरुख खान, अनन्या पांडे च्या उपस्थितीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सगळ्यात किंग खानच्या त्या व्हिडिओनं वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. फ्री प्रेस जर्नलनं याबाबत अधिक माहिती देणारे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT