shah rukh khan and mukta barve viral video on srk birthday  SAKAL
मनोरंजन

SRK Birthday: जेव्हा मुक्ता बर्वेला शाहरुखने हात देऊन स्टेजवर आणलं होतं, पाहा व्हिडीओ

मुक्ता बर्वेचा शाहरुख खानचा एक खास व्हिडीओ शेअर केलाय

Devendra Jadhav

SRK Birthday Video: आज शाहरुख खानचा वाढदिवस. शाहरुख खानने आजवर विविध सिनेमांमधुन स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. शाहरुख खानने २०२३ ला पठाण आणि जवान या दोन्ही सिनेमांंमधुन यावर्षी सुपरहिट कामगिरी केली.

आज शाहरुखच्या वाढदिवसानिमित्ताने हिंदी - मराठी मनोरंजन विश्वातील अनेक जण त्याला शुभेच्छा देत आहेत. अशातच मुक्ताने शाहरुखची एक खास आठवण सर्वांसोबत शेअर केली.

(shah rukh khan and mukta barve viral video on srk birthday)

मुक्ताची शाहरुखसोबत फॅन मुमेंट

मुक्ता बर्वेने शाहरुखच्या वाढदिवशी त्याच्यासोबतची एक खास मुमेंट शेअर केलीय. या व्हिडीओत पाहायला मिळतं की, मुक्ता बर्वेच्या हृदयांतर आणि स्माईल प्लीज सिनेमाच्या वेळी शाहरुख खान इव्हेंटला उपस्थित होता.

त्यावेळी मुक्ता बर्वेचं नाव पुकारताच शाहरुखने अत्यंत आदराने तिला हात देऊन स्टेजवर आणलं आणि तिला मिठी मारली. शाहरुखचा हा व्हिडीओ शेअर करुन मुक्ताने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

शाहरुखने वाढदिवसाला फॅन्ससोबत केलं सेलिब्रेशन

२ नोव्हेंबरला रात्री १२ वाजता मन्नतच्या गॅलरीबाहेर शाहरुख आला आणि फॅन्सने एकच जल्लोष केला.

शाहरुखने ब्लॅक टीशर्ट, डोक्यावर टोपी, डोळ्यावर चष्मा अशा खास अंदाजात मन्नतबाहेर आला होता. त्याने नेहमीप्रमाणे सर्वांना अभिवादन केलं.

शाहरुखला पाहताच मन्नतबाहेर एकच जल्लोष झाला. शाहरुखने सर्वांच्या प्रेमाचा स्वीकार केला.शाहरुखच्या वाढदिवशी डंकी सिनेमाचा पहिला टीझर रिलीज

शाहरुखच्या वाढदिवसाला डंकीच्या टीझरची भेट

शाहरुखच्या वाढदिवशी डंकी सिनेमाच्या टीझरची भेट त्याच्या फॅन्सना मिळाली आहे. सुरुवात होते एका डोंगराळ भागातुन. जिथे शाहरुख काही साथीदारांसोबत डोंगराळ भागात चालताना दिसतो. त्याच्यावर कोणीतरी बंदुक रोखुन उभं आहे.

अचानक टीझर पंजाबमध्ये घेऊन जातो. जिथे शाहरुख नाचुन - गाऊन धम्माल करताना दिसतो. त्याचे मित्रही दिसतात. तापसी पन्नू, विकी कौशलची झलक सिनेमात पाहायला मिळते. या मित्रांना लंडनमध्ये जायची इच्छा असते. आता त्यांचं स्वप्न पूर्ण होणार का? हे सिनेमात पाहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT