shah rukh khan and sanjay leela bhansali work together in inshallah after devdas SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan: सलमानच्या जागी किंग खान! 'देवदास'नंतर भन्साली - शाहरुख पुन्हा एकत्र?

शाहरुख खान - भन्साली आगामी सिनेमानिमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहेत

Devendra Jadhav

Sanjay Leela Bhansali Upcoming Project: संजय लीला भन्साली आणि शाहरुख खान यांनी देवदास सिनेमा गाजवला. २००२ साली आलेला देवदास आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

संजय - शाहरुख यांनी देवदासनंतर पुन्हा एकत्र काम केलं नाही. पण आता दोघांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. शाहरुख - भन्साली आगामी सिनेमानिमित्ताने पुन्हा एकत्र येत आहेत. वाचा सविस्तर...

'इंशाअल्लाह' ची उत्सुकता

खरं तर, संजय लीला भन्साळी त्यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'इन्शाअल्लाह' या वर्षी बनवण्याच्या तयारीत आहेत. या चित्रपटावर ते बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार भन्साळी या वर्षी मे किंवा जूनपासून या चित्रपटाचं शुटींग करण्याच्या तयारीत आहेत.

चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शनचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर या सिनेमासाठी सध्या स्टारकास्ट शोधली जात आहे. या चित्रपटासाठी सलमान खानचे नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. पण आता सलमानच्या जागी शाहरुख काम करणार आहे, अशी चर्चा आहे.

‘इंशाअल्लाह’मध्ये सलमानच्या जागी शाहरुख दिसणार?

'हम दिल दे चुके सनम'नंतर भन्साळी सलमान खानसोबत 'इंशाअल्लाह'मध्ये काम करणार असल्याचे बोलले जात होते. या चित्रपटात सलमानसोबत आलिया भट्टचेही नाव दिसले होते. पण आता सलमान खान या चित्रपटाचा भाग नसल्याच्या बातम्या येत आहेत. भाईजान आणि भन्साळी यांच्यातील काही मतभेदांमुळे हे घडले.

आता या चित्रपटात सलमानच्या जागी शाहरुख खान दिसणार आहे. या चित्रपटासाठी भन्साळी एका महिन्यात अनेकवेळा शाहरुख खानला भेटल्याचे वृत्त आहे. भन्साळींनी किंग खानला चित्रपटाची स्क्रिप्टही वाचून दाखवली, जी त्याला खूप आवडली. मात्र अद्याप काहीही ठरलेले नाही.

संजय लीला भन्साळी यांचा 'बैजू बावरा'

'इंशाअल्लाह' व्यतिरिक्त संजय लीला भन्साळी यांचा आणखी एक चित्रपट 'बैजू बावरा' देखील याच वर्षी प्रदर्शित होऊ शकतो. चित्रपट निर्मातेही या चित्रपटावर वेगाने काम करत आहेत. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT