Shah Rukh Khan ASK SRK Session  Sakal
मनोरंजन

ASK SRK Session: 'बाप-बाप होता है..!' जवान सुपरहिट झाला पण शाहरुख असं का म्हणाला?

Abram Khan Reaction On Jawan: शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम खान याची जवान सिनेमा पाहिल्यानंतर कशी प्रतिक्रिया होती हे त्याने सांगितलं.

Vaishali Patil

Abram Khan Reaction On Jawan: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवान चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा तो बॉलिवूडचा बादशाह कसा हे त्याने सिद्ध केलं. 7 सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या 'जवान' अजूनही प्रेक्षकांना थिएटरमध्ये आकर्षित करत आहे.

चित्रपट समीक्षकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. या चित्रपटातील शाहरुखच्या भुमिकेने सर्वांनाच आकर्षित केले आहे. आता यातच शाहरुखचा जवान त्याच्या चाहत्यांना तर खुपच आवडला मात्र त्याच्या घरच्या व्यक्तींना तो कसा वाटला याबद्दल त्याने स्वत: खुलासा केला आहे.

शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम खान याची जवान सिनेमा पाहिल्यानंतर कशी प्रतिक्रिया होती हे त्याने सांगितलं.

शाहरुखने ट्विटरवर 'आस्क एसआरके' सेशन आयोजित केले होतं, जिथे त्याने नेहमीप्रमाणे त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

याच सत्रात एका चाहत्याने शाहरुखला विचारलं की, 'त्याचा धाकटा मुलगा अबरामला जवान हा चित्रपट कसा आवडला?' या प्रश्नावर किंग खानने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.

तो लिहितो की ''बाप-बाप होता है!! नाही नाही, फक्त गंमत करतोय. त्याला मोठ्या माणसासोबत केलेली मारामारी आवडली. त्याला क्लायमॅक्स देखील आवडला."

तर दुसऱ्या यूजरने शाहरुखला विचारलं की मन्नतमध्येही पाली आहेत का? यावर उत्तर देताना शाहरुख म्हणला की, "पाली तर पाहिल्या नाहीत पण फुलपाखरु भरपूर येतात."

तर एकानं शाहरुख खानला जवानाच्या 1000 कोटींच्या कलेक्शनची पार्टी कुठे होणार? असा प्रश्न विचारला यावर शाहरुख म्हणला, 'पठाणच्या घरात आणखी कुठे!'

जवानच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरात या चित्रपटाच्या कामाईचा आकडा 938 कोटींच्या पुढे गेला आहे तर भारतात या चित्रपटाने 632.25 कोटींची कमाई केली आहे. आता शाहरुख डंकी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! दूध आणि भाज्यांवरुन ठरणार नवा पगार? 3490 कॅलरी फॉर्म्युला नेमका आहे तरी काय?

Marathi Sahitya Sammelan: धाराशिवमध्ये 32 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन; स्वागताध्यक्षपदी आमदार कैलास घाडगे पाटील

India Africa Relations: आफ्रिकेत ड्रॅगनला टक्कर: चीनच्या 'डेट-ट्रॅप' विरुद्ध भारताचा 'विश्वासू' विकास पॅटर्न!

भारतातील संशोधन आणि नवोपक्रमांना मोठी चालना! तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी नवे दालन खुले; 5 सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार

Latest Marathi News Live Update : हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज राज्य शिक्षण विभागाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले

SCROLL FOR NEXT