Shah Rukh Khan news esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan : 'आईचं स्वप्न होतं मी...', 'त्या' घटनेनंतर किंग खाननं घेतला मोठा निर्णय, मित्रासमोर शाहरुख झाला होता भावूक!

शाहरुखच्या (Shah Rukh Khan latest news) जवळच्या मित्रानं सांगितलेली ती आठवण सध्या चर्चेत आहे.

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan Entry In Bollywood: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खाननं तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. गेल्या (Shah Rukh Khan News) एका मुलाखतीमध्ये शाहरुखनं आपण बॉलीवूडमध्ये कमालीचे लोकप्रिय असून आपल्याला अजूनही हॉलीवूडवाले का पसंती देत नाहीत अशा आशयाची एक खंत व्यक्त केली होती. (Bollywood Latest news)

शाहरुख हा जसा त्याच्या अभिनयासाठी आणि हटके स्टाईलसाठी ओळखला जातो तसाच तो त्याच्या प्रतिक्रियांसाठी देखील कायम चर्चेत (Shah Rukh Khan Bollywood Entry) असणारा सेलिब्रेटी आहे. गेलं वर्ष शाहरुखसाठी भलतचं लाभदायी ठरल्याचे दिसून आले. त्याच्या पठाण, जवान आणि डंकी चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचे दिसून त्यात जवान आणि पठाण बॉक्स ऑफिसवर हजारोंची कमाई करुन वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता.

आता शाहरुख त्याच्या एका भावूक प्रतिक्रियेमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. न्युज १८ नं दिलेल्या त्या वृत्तानुसार शाहरुखनं बॉलीवूडमध्ये येण्याचं एक खास कारण होतं. त्यामुळे तो बॉलीवूडमध्ये आला आणि त्यानं स्वताच्या नावाची वेगळी मोहोर उमटवली असे म्हटले आहे. आताच्या घडीला शाहरुख केवळ बॉ़लीवूडच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा अभिनेता म्हणून शाहरुखचे नाव घ्यावे लागेल.

परदेशातही तगडी फॅन फॉलोइंग असणाऱ्या शाहरुखचा बॉलीवूड प्रवास मोठा संघर्षमय राहिला आहे. पाठीशी कुणीही गॉडफादर नसताना त्यानं स्वताची वेगळी दुनिया बॉलीवूडध्ये तयार केली. छोट्या पडद्यापासून शाहरुखनं त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तो बॉलीवूडमध्ये आला आणि त्यानं आपली छाप उमटवली.

शाहरुखनं त्याचा जवळचा मित्र विवेक वासवानीसोबत बोलताना असं सांगितलं की, मी चित्रपटात येण्यामागे एक खास कारण होतं. विवेक आणि शाहरुखनं जोश, राजू बन गया जंटलमॅन, किंग अंकल, इंग्लिश बाबू देसी मॅम आणि दुल्हा मिल गया सारख्या चित्रपटात काम केले आहे.

आईचं स्वप्न पूर्ण करायचं होतं म्हणून मुंबईत आलो...

सिद्धार्थ कननसोबतच्या एका मुलाखतीमध्ये विवेकनं सांगितलं की, शाहरुखच्या आईचं निधन झालं आणि तो तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी १९९१ मध्ये मुंबईला आला. त्यावेळी एक दिवस माझ्याकडे आला होता. मला म्हणाला की, मला अभिनेता व्हायचं आहे. मी त्याला म्हणालो की, तुला तर टीव्ही मालिकांमध्येच काम करायचे होते आणि आता तू म्हणतो आहेस की, तुला चित्रपटात यायचं आहे.

माझ्या त्या उत्तरावर शाहरुख म्हणाला की, माझ्या आईचं स्वप्नं होतं की मी मोठा सुपरस्टार व्हावं. शाहरुखनं मला त्याच्या आईच्या त्या शेवटच्या दिवसांतील अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. ज्या खूपच प्रेरणा देणाऱ्या होत्या. या सगळ्या गोष्टींमधून शाहरुख नावाचं रसायन तयार झालं. अशी आठवण विवेकनं सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT