Dunki Release Date Esakal
मनोरंजन

Dunki Release Date: जवान सुपरहिट होताच किंग खाननं सांगितली 'डंकी'ची रिलिज डेट! 'या' दिवशी शाहरुख करणार तिसरा धमाका

Vaishali Patil

Shah Rukh Khan Movie Dunki Release Date: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा सध्या त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाच्या यशानंतर शाहरुखने तो बॉलिवूडचा बादशाह कसा हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. इतकच नाही शाहरुखच्या जवाननं बॉक्स ऑफिसवर वादळचं आणलं.

शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी यांसारख्या कलाकारांच्या भूमिका असलेला 'जवान' हिंदी तसेच तमिळ आणि तेलुगू या भाषेत रिलिज करण्यात आला आणि रिलिजच्या दोन दिवसातच या चित्रपटाने 200 कोटींच्यावर कमाई केली.

आता 9 दिवसात चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 410.88 कोटी रुपये झाले आहे. त्यात आता हा चित्रपट आणखी नवीन काही रेकॉर्ड तयार करेल अशी चर्चा आहे. तर त्यातच शाहरुखने जवान चित्रपचटाचं यश साजरा करतांना त्याच्या आगामी डंकी या चित्रपटाबाबतही मोठा खुलासा केला आहे.

'जवान'च्या सुपरसक्सेसनंतर शाहरुख खान आणि चित्रपटाच्या टिमने सर्व चाहत्याचे आभार व्यक्त करण्यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमात शाहरुख खानने त्याच्या आगामी 'डंकी' या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

'जवान' चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात समोर शाहरुखने त्याच्या आगामी 'डंकी' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल सांगितले.

या व्हिडिओत किंग खान म्हणतो की, म्हणाला, 'आम्ही 26 जानेवारीपासून सुरुवात केली. पठाण प्रजासत्ताक दिनी रिलिज करण्यात आला . त्यानंतर जवान जन्माष्टमीला रिलिज केला. आता नवीन वर्ष येणार आहे म्हणजेच ख्रिसमस आहे, त्यावेळी आम्ही डंकी आणू. आणि जेव्हा माझा चित्रपट प्रदर्शित होतो तो दिवस नेहमीच ईद असतो. शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. म्हणजेच आता शाहरुखचा डंकी हा चित्रपट ईदच्या दिवशी रिलिज होणार अशी चर्चा आहे.

'डंकी' या चित्रपटाची रिलीज डेट समोर येताच शाहरुख खानचे चाहते चांगलेच उत्साहित झाले आहेत. 'डंकी' शाहरुख खानचा या वर्षातील तिसरा मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे आता पठाण आणि जवानच्या वादळानंतर डंकी किती मोठा धमाका करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT