Shah Rukh Khan cameo in Tiger 3 leaked Sakal
मनोरंजन

Tiger 3: 'टायगर 3' मधील शाहरुखचा कॅमिओ लीक, चित्रपटात सलमानला असा भेटणार 'पठाण'?

Salman Khan News: सलमान खानच्या टायगर 3 या चित्रपटात शाहरुख खानची एंट्री होणार आहे, या गोष्टीने त्याचे चाहते खूप खूश आहेत.

सकाळ डिजिटल टीम

'टायगर 3' मध्ये शाहरुख खान एका खास भूमिकेत असल्याचे चाहत्यांना समजले तेव्हापासून लोक त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या सीन-सीक्वेन्सबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

सलमानसोबतच्या त्याच्या खास अॅक्शन सीन्ससाठी मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये सेट बनवण्याचे काम जोरात सुरू आहे. असे सांगितले जात आहे की, दोन्ही खान पुढील महिन्यात चित्रपटाचे खास सीन शूट करणार आहेत. सुमारे दोन आठवडे शूटिंग सुरू राहणार आहे.

यावेळी मायानगरीमध्ये एक नवीन बातमी पसरली आहे.. की 'टायगर 3'मध्ये सलमान आणि शाहरुख कसे दिसणार? त्याची माहितीही लीक झाली आहे. (Entertainment News in Marathi)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी चित्रपटात शाहरुख सलमानसोबत तुरुंगातून पळून जाणार असा सीन ठेवला आहे. कथेत टायगरला तुरुंगातून पळून जावे लागते.

पठाण आपल्या मित्राच्या मदतीसाठी तेथे उपस्थित राहणार आहे. एवढेच नाही तर या खास सीनमध्ये लोकप्रिय भारतीय जिम्नॅस्टही दिसणार असल्याचे ऐकायला मिळत आहे. तुरुंगातील त्याची व्यक्तिरेखा खलनायकाची असून, त्याच्याशी भांडण केल्यानंतर शाहरुख आणि सलमान एकत्र दिसणार आहेत.(Latest Marathi News)

'पठाण'प्रमाणेच 'टायगर 3'मध्ये कॅमिओ पात्रांना महत्त्व देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 'पठाण' चित्रपटातील एका महत्त्वाच्या दृश्यात सलमान दिसला होता. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी अधिक आनंददायी झाला. निर्मात्यांना सलमानच्या चित्रपटात शाहरुखची उपस्थिती मोठ्या प्रमाणात हवी आहे.

'टायगर 3' हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. सलमान खान या चित्रपटात टायगरच्या भूमिकेत पुनरागमन करत आहे. तर कतरिना कैफ जोयाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: भारताचे ओपनर माघारी परतले! Shubman Gill ने पुन्हा मैदान गाजवले; गावस्कर, सोबर्स यांचा विक्रम मोडला

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावरील व्हॅक्सिन बॉक्स चोरी प्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

'ठरलं तर मग' मालिकेसाठी आजीची गोंडस विनंती, व्हिडिओ पाहून जुई गडकरी म्हणाली... 'आजी, किती गोड...'

Canada Study Permit: कॅनडामध्ये स्टडी परमिटशिवाय शिक्षणाची परवानगी; कोण पात्र? काय आहेत नियम? वाचा, एका क्लिकवर

Yuzvendra Chahal: इंग्लंडच्या मैदानात चहलचा जलवा! ६ फलंदाजांना अडकवलं फिरकीच्या जाळ्यात; पाहा Video

SCROLL FOR NEXT