Shah Rukh Khan comment on Virat Kohli Jawan Movie  esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan : 'विराट कोहली जावई आहे आपला'! किंग खान असं का म्हणाला?

शाहरुख हा त्याच्या आस्क मी एनीथिंग या खास उपक्रमांतर्गत चाहत्यांशी संवाद साधत असतो. यावेळी त्याला चाहते त्यांच्या मनातील प्रश्न बिनधास्तपणे विचारतात.

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan comment on Virat Kohli Jawan Movie : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा सध्या त्याच्या जवान नावाच्या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. साऊथचा दिग्दर्शक अॅटलीच्या या चित्रपटानं आतापर्यतत सातशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. याच वर्षी शाहरुखचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

शाहरुख हा त्याच्या आस्क मी एनीथिंग या खास उपक्रमांतर्गत चाहत्यांशी संवाद साधत असतो. यावेळी त्याला चाहते त्यांच्या मनातील प्रश्न बिनधास्तपणे विचारतात. त्याला किंग खान मनमोकळेपणानं उत्तरं देताना दिसतो. आताही त्यानं एका प्रश्नावर जे उत्तरं दिलं त्यावरुन वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. शाहरुखनं यावेळी टायगर ३ वर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Also Read - Fire - पण पुढचं आयुष्य 'थंडा थंडा, कूल कूल'

शाहरुखनं त्याच्या आगामी डंकी नावाच्या चित्रपटाविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे. त्यात तो म्हणतो, या चित्रपटासाठी मी खूपच उत्सुक आहे. राजकुमार हिरानी यांच्यासोबतचा हा प्रोजेक्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी या प्रोजेक्टटी वाट पाहत आहे. याप्रसंगी त्यानं जवानमधील त्या गोष्टीविषयी सांगितले आहे. तसेच त्यानं विराट कोहलीवर केलेली कमेंटही चर्चेत आली आहे.

एका चाहत्यानं शाहरुखला विराट कोहलीवरुन प्रश्न विचारला होता. तो फॅन म्हणतो, एसआरके तू याविषयी एकदा बोल, त्यावेळी शाहरुख म्हणाला, आय लव यू विराट कोहली. तो नेहमीच माझा फेव्हरेट राहिला आहे. तो मला जावयासारखा आहे. अशा शब्दांत किंग खाननं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शाहरुखनं जवानमधील त्या गाण्याच्या वेळचा भन्नाट किस्साही यावेळी सांगितला. तो म्हणाला नॉट रमैय्या या गाण्याच्या दरम्यान मी विक्रम राठोड होतो. पण मिशी लावायची राहून गेली होती. मला त्याबाबत आठवण करुन देण्यात आली तेव्हा मात्र ती गोष्ट कळली. अशी भन्नाट आठवण शाहरुखनं फॅन्ससोबत शेयर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT