Pathaan Movie
Pathaan Movie Sakal
मनोरंजन

Pathaan: शाहरुखसाठी काय पण! जबरा फॅन तिकिटासाठी दहा हजार देण्यास तयार

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान गेल्या चार वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून गायब होता. आता त्याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित झाला आहे आणि तो येताच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्ल होणारा शो पाहून असे वाटते की किंग खान पुनरागमन करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होता आणि संधी मिळताच त्याने राजासारखे शानदार पुनरागमन केले आहे.

पठाण चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवसच झाले आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 57 कोटींची कमाई केली. दुसरीकडे, जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे तर, चित्रपटाने कमाईच्या बाबतीत 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

गुरुवार 26 जानेवारी असल्याने वीकेंड पडला आणि त्याचा पुरेपूर फायदा पठाणला झाला. दुसऱ्या दिवशीही चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांबाहेर लोकांनी मोठी गर्दी केली होती. अशी स्थिती आली आहे की, शो हाऊसफुल्ल असल्याने लोकांना पठाणचे तिकीट मिळू शकले नाही.

दरम्यान, शाहरुखच्या चाहत्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, जो चित्रपट रिलीज होण्यापूर्वीचा होता. पठाणच्या अॅडव्हान्स बुकींगदरम्यान तिकीट न मिळाल्याने शाहरुखचा चाहता इतका नाराज झाला की, त्याने चित्रपटाच्या तिकिटासाठी 10,000 रुपये द्यायलाही तयार झाला होता.

शाहरुखच्या या जबरा फॅनचा व्हिडिओ पहिल्यांदा यूट्यूबवर शेअर करण्यात आला होता, जो आता ट्विटरवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्याच्या एका फॅन पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिकीट न मिळाल्याने शाहरुखचे चाहते थिएटरबाहेर गर्दीत उभे आहेत.

दरम्यान, एका चाहत्याने प्रसारमाध्यमांना अनोखी विनंती केली की, "आम्हाला तिकिटे मिळत नाहीत. तुम्ही लोक वेगवेगळ्या माध्यमांचे आहात. तुम्हाला तिकीट मिळाले तर मला द्या, मी तुम्हाला 10 हजार द्यायला तयार आहे. फक्त मला तिकीट आणून द्या. मी जाईन."

जबरा फॅनची विनंती ऐकून एका मीडिया व्यक्तीने विचारले की, तो चित्रपट पाहण्यासाठी फक्त तिकिटासाठी इतके पैसे खर्च करण्यास तयार आहे. यावर प्रतिक्रिया देताना चाहत्याने ‘चलेगा’ असे म्हटले. हे ऐकताच शाहरुखचे बाकीचे चाहते आनंदाने जल्लोष करू लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खाणीत लिफ्ट पडल्याने 14 लोक अडकले, बचाव कार्य सुरू...7 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

SCROLL FOR NEXT