shah rukh khan fan in sangli srk universe book full auditorium theatre for pathaan movie sakal
मनोरंजन

Shah Rukh Khan Pathaan: 'पठाण'साठी सांगलीच्या पठ्ठ्यानं अख्खं थिएटरच केलं बुक.. शाहरुखही म्हणाला..

पठाण वादात अडकला खरा पण करणार दर्जेदार कमाई..

नीलेश अडसूळ

pathaan: भगव्या बिकिनीमुळे सुरुवातीला वादात अडकलेला पठाण आता चांगलाच प्रगतीपथावर आहे. पठाण चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. पण त्या आधीच शाहरुखच्या चाहत्यांनी बूकिंगसाठी गर्दी केलेली दिसतेय. त्यामुळे पहिल्याच दिवशी हा चित्रपट कोट्यावधींची कमाई करणार असे दिसते आहे. अशातच सांगलीच्या एका पठ्ठ्यानं कहरच केला आहे.

(shah rukh khan fan in sangli srk universe book full auditorium theatre for pathaan movie)

'पठाण' चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात दीपिका पडूकोणने घातलेल्या भगव्या बिकिनी वरुण चांगलेच वातावरण तापले होते. हा चित्रपट चालूच देणार नाही अशी मागणी करण्यात आली होती. बॉयकॉट पठाण म्हणजे या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासाठी अनेक संघटना पुढे आल्या होत्या.

त्यामुळे पठाणचे भवितव्य धोक्यात येणार असे वाटले होते, पण सध्या ज्या पद्धतीने पठाणला प्रेम मिळत आहे, ते पाहून पठाण बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

सध्या 'पठाण'ची जोरदार अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. काही ठिकाणी तर सगळे शो हाऊसफूल झाले आहेत. एवढंच नाही तर 'पठाण' पाहण्यासाठी सांगलीच्या एसआरके युविव्हर्स या फॅन क्लबनं अख्खं ऑडिटोरियमच बुक केलं आहे. 

एसआरके (SRK) वासिम या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये काही मुलं हातात पठाण चित्रपटाची तिकीटं घेऊन पठाणच्या पोस्टरसमोर उभी आहेत. या ट्वीटला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं  आहे, "सर, प्लिज हे पाहा, आम्ही पूर्ण ऑडिटोरियम बूक केलं आहे. पठाण चित्रपट बघण्यासाठी सांगली एसआरके युविव्हर्स  तयार आहे."

विशेष म्हणजे, या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, "थँक्यू आणि तुम्हाला हा चित्रपट आवडेल, अशी आशा बाळगतो." असे शाहरुखने म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT