Shah Rukh Khan Fans Create Guinness World Record For Most People Performing His Iconic Pose  SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan: तो आला अन् त्याने जिंकलं.. फॅन्सने किंग खानसमोर केला वर्ल्ड रेकॉर्ड, व्हिडीओ व्हायरल

फॅन्समध्ये शाहरुखची किती हवा आहे याचा अनुभव नुकताच आला. या फॅन्सनी चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं.

Devendra Jadhav

Shah Rukh Khan News: शाहरुख खान हा भारतीयच नव्हे तर जगभरातील तमाम फॅन्सच्या गळ्यातला ताईत.

शाहरुख खानने या वर्षी पठाण सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धमाका केला. शाहरुखची किती क्रेझ आहे हे पठाण सिनेमातून दिसलं.

पठाणने न भूतो न भविष्यती असा रेकॉर्ड करत बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा गल्ला जमवला. फॅन्समध्ये शाहरुखची किती हवा आहे याचा अनुभव नुकताच आला. या फॅन्सनी चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं आहे.

शाहरुख अनेकदा त्याचं घर मन्नत बाहेर उभ्या असलेल्या फॅन्सना भेटत त्याचं प्रेम स्वीकारत असतो.

शाहरुख खानचे वांद्रे येथील निवासस्थान 'मन्नत' हे त्याच्या चाहत्यांसाठी एक आवडते ठिकाण आहे, जिथे लोक किंग खानची एक झलक पाहण्यासाठी दररोज कडक उन्हात उभे असतात.

शाहरुखही अनेकदा घराच्या बाल्कनीत येऊन आपल्या चाहत्यांना सरप्राईज देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.

10 जून 2023 रोजी पुन्हा एकदा शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती, पण यावेळी असे काही घडले ज्याने इतिहास रचला. वास्तविक, शाहरुख स्टारर चित्रपट 'पठाण' हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक असून त्याचा वर्ल्ड प्रीमियर 18 जून 2023 रोजी स्टार गोल्डवर होणार आहे. त्यामुळे स्टार गोल्डने शाहरुखच्या चाहत्यांसह इतिहास रचण्याचा निर्णय घेतला.

स्टार गोल्डने शाहरुख खानच्या चाहत्यांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचा निर्णय घेतला जो ऐतिहासिक ठरला. मीडियाच्या उपस्थितीत, शाहरुख खानच्या 300 चाहत्यांनी SRK च्या आयकॉनिक पोझ केली आणि त्यांचे नाव थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले.

शाहरुख खानचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये किंग खान चाहत्यांसोबत आयकॉनिक पोज देताना दिसत आहे. यादरम्यान, अभिनेत्याने 'पठाण' मधील 'झूमे जो पठाण' गाण्याचे हुक-स्टेप देखील केले.

याशिवाय हाय-हॅलो म्हणत त्याने चाहत्यांना फ्लाइंग किस्सही दिले. पठाणचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार गोल्ड १८ जूनला स्टार गोल्ड वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT