Shah Rukh Khan Jawan Box Office Collection Trolled esakal
मनोरंजन

Shah Ruhk Khan : 'जास्त बोलू नको तू फक्त....', जवानच्या कमाईचे आकडे खोटे म्हणणाऱ्यावर किंग खान गरजला!

बॉक्स ऑफिसवरील जवानच्या कमाईचे आकडे खोटे आहेत अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan Jawan Box Office Collection Trolled : किंग खान शाहरुखचा जवान प्रदर्शित झाल्यानंतर त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड मोठा असल्याचे दिसून आले. यापूर्वी याच वर्षी शाहरुखचा पठाण नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादाचा विषय होता. त्यानं हजार कोटींची कमाई केली होती. अशातच जवाननंही सातशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

यासगळ्यात शाहरुखच्या जवानच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईचे आकडे हे खोटे असल्याची चर्चा सुरु झाली. त्यावर आता किंग खाननं प्रतिक्रिया दिली आहे. ज्यानं कुणी ही पोस्ट केली होती, त्याला शाहरुखनं त्याच्या शब्दांत उत्तरं दिली आहे. साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटलीनं दिग्दर्शित केलेल्या जवानमध्ये प्रियामणि, नयनतारा, गिरीजा ओक, सान्या मल्होत्रा आणि विजय सेतुपति यांच्या भूमिका होत्या.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

जवान हा पठाणचे रेकॉर्ड ब्रेक करेल अशी चर्चा असताना दुसरीकडे दोन आठवड्यांनंतर या चित्रपटाच्या कमाईला थोडा ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला ज्या वेगानं जवाननं कमाई केली होती ती पाहता अनेकांनी हा चित्रपट बॉलीवूडमध्ये नवा विक्रम करेल असे म्हटले होते. तसा एक मोठा विक्रम जवानच्या नावावर नोंदला गेला. तो म्हणजे पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई पहिला हिंदी चित्रपट अशी त्याची नोंद घेतली गेली.

आस्क एसआरके या सेशनमध्ये शाहरुख हा त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. यावेळी एका नेटकऱ्यानं त्याला तुझ्या जवान चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील कमाईचे आकडे खोटे आहेत का, अशी विचारणा केली होती. त्यावर संतापलेल्या किंग खाननं त्याला दिलेले उत्तर हे आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. शाहरुखनं त्याला जशास तसे उत्तर देत त्याची बोलतीच बंद करुन टाकली आहे.

शाहरुख त्या ट्रोलर्सला उत्तर देताना म्हटले की, तू जरा शांत बस, आणि फक्त मोजत राहा...बस्स..कमाईचे आकडे मोजताना जास्त विचार करु नकोस.अशा शब्दांत त्याला सुनावले आहे. सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे. अनेकांनी त्यावरुन शाहरुखला देखील बॉक्स ऑफिसच्या कमाईच्या आकड्यांवरुन विचारणा केली आहे.

शाहरुखच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याचा राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी याच वर्षी डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी तो कमालीचा उत्सुक आहे. तो पहिल्यांदाच राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. यापूर्वी हिरानी यांनी शाहरुखला कास्ट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र शाहरुखनं तो प्रस्ताव फेटाळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2026

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT