Shah Rukh Khan News Shah Rukh Khan News
मनोरंजन

Shah Rukh Khan : किंग खानची झाली चांदी! सिनेमाच्या रिलीजपूर्वीच कोट्यवधींची कमाई

दोन महिन्यांमध्ये शाहरुख खानच्या जवान या सिनेमाचं शूटिंग पूर्ण होईल

सकाळ डिजिटल टीम

Shah Rukh Khan News बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) चाहते चार वर्षांपासून त्याच्या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. जवळपास चार वर्षांनंतर शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळाली ती म्हणजे ब्रह्मास्त्र सिनेमामधून. ब्रह्मास्त्र सिनेमांमध्ये शाहरुख खानने एका संशोधकाची भूमिका साकारली होती. मात्र, असं असले तरी शाहरुख खानचा सिनेमा कधी येणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.

सध्या शाहरुख (Shah Rukh Khan) अनेक मोठ्या प्रोजेक्टवर काम करीत आहे. त्यापैकीच एक एटली यांचा जवान सिनेमा. हा सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित होईल. जवान सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी बराच वेळ असला तरी या सिनेमाने प्रदर्शित होण्यापूर्वीच कोट्यवधींची कमाई केली आहे. होय जवान सिनेमाने प्रदर्शनाच्या आधीच तब्बल अडीचशे कोटी कमावल्याच्या चर्चा आहेत.

दोन महिन्यांमध्ये शाहरुख खानच्या जवान या सिनेमाचं शूटिंग पूर्ण होईल. २०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाने प्रदर्शित होण्यापूर्वीच अडीचशे कोटींहून अधिक कमावले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सिनेमाचे सॅटेलाईट आणि स्ट्रीमिंग राईट्स आधीच विकले गेले आहेत.

नेटफ्लिक्सने (Netflix) जवान सिनेमाच्या स्ट्रीमिंग राईट्ससाठी अडीचशे कोटी मोजले आहेत. झी टीव्हीने सिनेमाचे सॅटेलाईट राईट्स म्हणजेच प्रसारणाचे हक्क खरेदी केले आहेत. मात्र, यासाठी झी टीव्हीने किती पैसे मोजले हे अद्याप कळू शकलेले नाही.

जवानमध्ये तगडी स्टारकास्ट

जवान सिनेमामध्ये थलपती विजय, विजय सेतुपती आणि नयनतारा हे कलाकार झळकणार आहेत. हिंदी सोबतच हा सिनेमा तमिळ, तेलगू आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होईल. २०१८ मध्ये आलेल्या झिरो सिनेमानंतर शाहरुख खान एकाही सिनेमात झळकलेला नाही. मात्र, लवकरच तो तीन धमाकेदार सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार हिरानी यांच्या डंकी आणि सिद्धार्थ आनंद यांच्या पठान या सिनेमातून शाहरुख खान झळकणार आहे. एवढेच नव्हे तर सलमान खानच्या टायगर-३ या सिनेमात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतून झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT