Shah Rukh Khan, Aryan and Jaya Bachchan Instagram
मनोरंजन

आर्यनबद्दल शाहरुख-जया बच्चन यांच्यातील 'तो' संवाद पुन्हा होतोय व्हायरल |Aryan Khan

नेटकऱ्यांनी शाहरुखसाठी व्यक्त केली सहानुभूती

स्वाती वेमूल

नेटकऱ्यांनी शाहरुखसाठी व्यक्त केली सहानुभूती

क्रुझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यनच्या Aryan Khan जामीन याचिकेवर येत्या २६ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर आर्यनने त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारी शाहरुखने आर्थर रोड कारागृहात जाऊन मुलाची भेट घेतली. आर्यनच्या अटकेनंतर पहिल्यांदाच बापलेकाची भेट झाली होती. आता सोशल मीडियावर शाहरुखचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो आर्यनविषयी बोलताना दिसत आहे. 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त शाहरुखने जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा करणने शाहरुखला त्याच्या मुलाबद्दल प्रश्न विचारला होता.

तुझा मुलगा मोठा होऊन अभिषेकसारखा बनावा, यासाठी तू काही प्रयत्न करत आहेस का, असा प्रश्न करण जोहरने शाहरुखला विचारला. त्यावर शाहरुख म्हणाला, "असं घडल्यास माझ्यासाठी ही अभिमानाची बाब असेल आणि त्याच्यासाठीसुद्धा. आता तो १०० मीटर धावणी स्पर्धेतही पहिल्या क्रमांकावर नाही आला तर मला वाईट वाटतं. इथूनच सुरुवात होते आणि हा प्रत्येक पालकांच्या आयुष्यातील एक भाग आहे असं मला वाटतं." शाहरुखचं हे बोलणं ऐकून पुढे जया बच्चन म्हणतात, "शाहरुखचा मुलगा स्पर्धेत बाजी मारू शकला नाही, ही बाब जास्त अधोरेखित केली जाते, म्हणून ते जास्त त्रासदायक असतं. यात मुलांची काहीच चूक नाही. पण एका दृष्टीने हे चांगलंसुद्धा आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख यांच्या मुलांनी अपयशाला, संघर्षलाही सामोरं जावं. कारण त्याशिवाय त्यांना त्याचं महत्त्व समजणार नाही." जया बच्चन यांच्या या मतावर शाहरुख गमतीशीरपणे म्हणतो, "त्याला संघर्ष करावा लागू नये यासाठी मी जास्त प्रयत्न करतोय. कारण तो आता काय करतोय याची फार कोणाला काळजी नाही."

'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात शाहरुखने अमिताभ आणि जया यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. या जुन्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आर्यनबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी जया बच्चन यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शविली आहे. सुपरस्टारचा मुलगा असल्याची किंमत आर्यनला मोजावी लागतेय, असं मत काहींनी मांडलंय. तर काहींनी शाहरुखबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT