Gauri Khan Book Launch, shah rukh khan, my life in design book SAKAL
मनोरंजन

Gauri Khan Book Launch: नवरा असावा तर असा..! शाहरुख खानने केलं बायको गौरी खानचं बुक लाँच

सोमवारी मुंबईत या पुस्तकाचे प्रकाशन झाले

Devendra Jadhav

Gauri Khan Book Launch News: शाहरुख खानने पत्नी गौरी खानचे पहिले पुस्तक, माय लाइफ इन डिझाईन लाँच केलं. सोमवारी मुंबईत या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

गौरीचे कॉफी टेबल बुक, Ebury Press द्वारे निर्मित, शाहरुख खानच्या हस्ते लाँच झाले.

या खास सोहळ्याला शाहरुखची तिन्ही मुले आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान उपस्थित होते.

(Shah Rukh Khan launches Gauri Khan’s debut book, My Life in Design)

शाहरुख खानच्या बुक लाँच सोहळ्यात शाहरुख आणि गौरी खान यांनी एकमेकांना मॅचिंग असा काळ्या रंगाचा पोशाख परिधान केलाय आणि एकत्र पुस्तकाचे प्रकाशन केले.

विशेष गोष्ट म्हणजे, गौरीच्या पुस्तकाची प्रस्तावना शाहरुख खानने लिहिली आहे. “मी, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी लहान मुलगी आणि माझी बहीण यांच्या तुलनेत गौरी ही आता खऱ्या अर्थाने घरातील सर्वात जास्त बिझी असणारी व्यक्ती आहे,” त्याने स्पष्ट केले.

माय लाईफ इन डिझाईन पुस्तकात गौरीने विविध सेलिब्रेटींसाठी केलेल्या काही महत्त्वाच्या डिझाइन फोटोंचा समावेश आहे.

इंटिरिअर डिझायनर या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या किंवा सर्वसाधारणपणे डिझाइनबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या लोकांनाही, गौरीचं हे पुस्तक मार्गदर्शनपर असणार आहे.

शाहरुख खानने या पुस्तकाबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या आणि बायको म्हणून गौरीचं कौतुकही केलं

शाहरुख खानच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झालं तर.. अलीकडेच सिद्धार्थ आनंदच्या सुपरहिट 'पठान' सिनेमात शाहरुखदिसला होता.

याशिवाय शाहरुख लवकरच अॅटलीचा आगामी जवान आणि राजकुमार हिरानीच्या डंकीमध्ये देखील दिसणार आहे.

याशिवाय सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटात सुद्धा शाहरुख पुन्हा एकदा पठाण च्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT