Jawan Prevue Theme:  Esakal
मनोरंजन

Jawan Prevue Theme: 'जवान'ची प्रिव्ह्यू थीम रिलीज! गाणं ऐकून शाहरुखच्या चाहत्यांनी धरला ठेका

Vaishali Patil

Jawan Prevue Theme:  बॉलीवूड सुपरस्टार किंग खान हा सध्या त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा प्रिव्ह्यू रिलीज करण्यात आला होता. हा प्रिव्ह्यू सध्या सोशल मडियावर व्हायरल झाला आहे.

या चित्रपटाच्या प्रिव्ह्यूमध्ये शाहरुख खानचे अनेक वेगळे लूक पाहायला मिळाले आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटावरुन वाद झाला मात्र त्याने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत इतिहास रचला होता. आता असचं काही तरी 'जवान' चित्रपटही करणार असा विश्वास शाहरुखच्या चाहत्यांना आहे.

'जवान' चित्रपटाच्या प्रिव्ह्यूला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता जवान चित्रपटाची थीम प्रिव्ह्यूही रिलिज करण्यात आली आहे. हे गाणे सोशल मिडियावर रिलीज करण्यात आले आहे. हे एक रॅप गाणे आहे, ज्याचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे आणि गीते राजा कुमारी यांनी ते लिहिलं आहे.

'जवान' चित्रपट दिग्दर्शक अॅटली कुमारने या प्रिव्ह्यू गाण्याच्या थीमची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही थीम शेयर करत इंस्टाग्रामवर शेअर करत अॅटलीने लिहिले की, "जवान @iamsrk @gaurikhan @anirudhofficial @_gauravverma @redchilliesent #Jawan 7 सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये जगभरात प्रदर्शित होणार."

यासोबतच त्याने पूर्ण गाणं कुठे ऐकता येईल याची लिंकही शेअर केली आहे. प्रिव्ह्यूप्रमाणेच त्याचे थीम साँगही चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे.

चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये नयनतारा, सान्या मल्होत्रा, विजय सेतुपती आणि प्रियामणी यांचा समावेश आहे. दीपिका पदुकोण देखील चित्रपटात स्पेशल अपिअरन्समध्ये आहे. हा सिनेमा 7 सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलिज होणार आहे.

शाहरुखचा जवान हा चित्रपट हा रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रेझेंटेशन आहे. ज्याचे दिग्दर्शन अॅटली यांनी केले असून गौरी खाननं निर्मात्या तर गौरव वर्मा सह-निर्मात्याच्या भूमिकेत आहे.

शाहरुखच्या पुढच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 'डंकी' चित्रपटातही दिसणार आहे. ज्याचे शुटिंग सध्या सुरु आहे. शाहरुख सलमान खानच्या 'टायगर 3' मध्येही कॅमिओ करणार अशा चर्चा आहेत. आता मात्र त्याचे चाहते त्याच्या 'जवान' चित्रपटासाठी खुपच उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune land deal: मुंढवा जमीन गैर व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना क्लिन चीट, दोषी कोण? अहवालात काय म्हटलं?

नेवासे तालुका हादरला! 'सदस्यांच्या छळाला कंटाळून पदाधिकाऱ्याने जीवन संपवले'; शिक्षण संस्थेच्या सहा सदस्यांवर गुन्हा, चिठ्ठीत काय दडलयं?

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

SCROLL FOR NEXT