Shah Rukh Khan ASK SRK Esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan ASK SRK: 'आता वय झालं,वडिलांचा रोल कधी करणार?', शाहरुख म्हणाला, 'तु..'

आजही शाहरुखने पुन्हा एकदा ट्विटरवर #AskSRK हे सत्र केले, जिथे त्याने चाहत्यांशी संवाद साधला आणि विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

सकाळ डिजिटल टीम

Shah Rukh Khan ASK SRK: शाहरुख खानच्या पठाण चित्रपटानं तर बॉक्स ऑफिसवर तुफान राडा केला आहे. हा चित्रपटाने सर्वांनाच वेड केलं आहे. फक्त भारतातच नाही तर संपुर्ण जगात याची क्रेझ पाहायला मिळतं आहे. दरम्यान या बद्दल शाहरुखनं त्याच्या चाहत्यांचेही आभार मानले. तर गेल्या काही काळापासून शाहरुख खान ट्विटरवर सतत एसआरके सेशन करत आहे आणि चाहत्यांशी संपर्क साधत आहे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहे.

आजही शाहरुखने पुन्हा एकदा ट्विटरवर #AskSRK  हे सत्र केले, जिथे त्याने चाहत्यांशी संवाद साधला आणि विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

दरम्यान, एका चाहत्यानं शाहरुख खानला मस्करीत प्रश्न विचारत लिहिले की, "तू अशी हिरोचीच भूमिका साकारणार आहेस की चित्रपटात हिरो हिरोईन यांचा वडील बनण्याचा विचार आहे का?"

चाहत्याच्या या प्रश्नाला शाहरुख खानने उत्तरही तसेच हटके दिले. या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख खानने लिहिले की, "तु वडील हो... मी फक्त हिरो आहे."

शाहरुख हा त्याच्या विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. त्यामुळं त्याच्या या उत्तरावरही नेटकरी हसलेच आहेत.

तर दुसऱ्या एका युजरने शाहरुख खानला सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबद्दल विचारले. युजरने शाहरुखला या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अंदाज विचारला. यावर किंग खानने लिहिले की, “भाई की पिक्चर है… देखना तो लजमी है.”

25 जानेवारीला 'पठाण' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम त्याच्यासोबत दिसले आहेत. तर सलमान खानने कॅमिओ रोल केला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच जबरदस्त कमाई केली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने जगभरातून 725 कोटींचा गल्ला जमवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT