Pathaan Controversy Esakal
मनोरंजन

Pathaan Controversy: आसामच्या मुख्यमंत्र्याना किंग खानचा मध्यरात्री फोन म्हणाला,..

कोण शाहरुख? म्हणताच शाहरुखनं दिला आसामच्या मुख्यमंत्र्याना ...

Vaishali Patil

शाहरुख खानचा चित्रपट सध्या प्रमोशन न करता चर्चेत आहे. पठाण चित्रपटाने चागलाचं दंगा केला आहे. मग बिकिनी वाद असो किंवा त्याचा रंग. त्यातच आता आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमांची प्रतिक्रियाही चर्चेत आली आहे. शाहरुख खान कोण आहे? त्याच्याबद्दल किंवा त्याच्या चित्रपटाबद्दल काहीच माहिती नाही असं त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं.

याशिवाय शाहरुख खानने आपल्याला फोन केला नसल्याचेही त्यानी सांगितले. त्यांने फोन केल्यास प्रकरण गांभीर्याने घेत कारवाई केली जाईल. फोन केल्यास गुन्हाही नोंदवला जाईल, असेही त्यांनी सांगितले होते.

त्यांचे हे उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आले, त्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्याक्त केली आणि त्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांनी मुख्यमंत्र्याना ट्रोल केलं. दरम्यान, आता पुन्हा हिमंत सरमांनी शाहरुख बद्दल एक ट्विट केलं आहे. आता त्याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी ट्विट केले की, 'बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने मला पहाटे 2 वाजता फोन केला. आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान गुवाहाटीत घडलेल्या एका घटनेबद्दल त्यांनं चिंता व्यक्त केली आहे. यावर मी त्यांला आश्वासन दिले की कायदा व सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. यावर आम्ही कारवाई करू आणि असा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊ.'

गेल्या काही दिवसात गुवाहाटीतील सिनेमागृहासमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपटाच्या विरोधात निदर्शने केली. तेथे चित्रपटाचे पोस्टरही जाळण्यात आले. अलीकडे देशातील शहरांमध्ये पठाणांच्या विरोधात निदर्शने होत आहेत. अनेक नेत्यांनी वक्तव्येही केली आहेत. सिद्धार्थन आनंद दिग्दर्शित पठाण हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT