Shah Rukh Khan Pathaan Row esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan Pathaan Row: 'हिंदू असतो तर माझं नाव...' शाहरुखनं विषय संपवला की पुन्हा नवा वाद?

किंग खान शाहरुखच्या मागे लागलेला पठाणचा वाद काही संपण्याचे नाव घ्यायला तयार नाही.

सकाळ डिजिटल टीम

Shah Rukh Khan Pathaan Controversy now hindu name trend viral: किंग खान शाहरुखच्या मागे लागलेला पठाणचा वाद काही संपण्याचे नाव घ्यायला तयार नाही. पण हरेल तो शाहरुख कसला त्यानं आता यासगळ्या वादावर दिलेली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे तो पुन्हा लाईमलाईटमध्ये आला आहे. दीपिकासोबत बिकीनीमध्ये डान्स करुन शाहरुख वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

सोशल मीडियावर गेल्या आठवडाभरापासून पठाण आणि बेशरम रंग गाण्यावरुन नुसता धुराळा उडाला आहे. दीपिकानं परिधान केलेली बिकीनी त्याला राजकीय, धार्मिक अर्थ जोडला जात असल्यानं नेटकऱ्यांनी शाहरुखचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. याबाबत तर मध्यप्रदेशाचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्रमकपणे आपले विचार मांडले आहेत. जाणीवपूर्वक हिंदू धर्माचा अपमान केला जात आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. शाहरुखच्या चित्रपटाला विरोध केल्याशिवाय राहणार नाही.

Also Read: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

मिश्रा यांच्या वक्तव्याचे देशभर पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे. आता तर आणखी दोन ते तीन दिवसांनी पठाणमधील चित्रपटातील जे दुसरे गाणे प्रदर्शित होणार आहे त्यावरुन देखील वेगवेगळे प्रश्न नेटकरी विचारु लागले आहे. यासगळ्यात सोशल मीडियावर शाहरुखनं नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांसाठी खुलासा केला आहे. त्यामध्ये त्यानं आपण जर हिंदू असतो तर यासगळ्या गोष्टी झाल्या असत्या का असा प्रश्न किंग खाननं उपस्थित केला होता. सोशल मीडियावर जे काही व्हायरल होते आहे त्यावरुन चाहत्यांना विचार करण्याची सवय लागली आहे. जी चुकीची आहे.

शाहरुखनं यावेळी आपलं नाव जर हिंदू धर्मातील असते तर काय झाले असते असं सांगून पुन्हा एका नव्या वादाला सुरुवात करुन दिली आहे. तसं असते तर परिस्थिती माझ्यासाठी बदलली असती का...असे विचारुन राज्यकर्त्यांना विचार करण्यास भाग पाडले आहे. अर्थात तो व्हिडिओ शाहरुखच्या एका जुन्या मुलाखतीचा आहे. माझं नाव शेखर राधा कृष्ण असे असते तर...शाहरुखनं असे सांगताच उपस्थित प्रेक्षकांनी त्याला उस्फुर्त दाद दिल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Sonawane : पुस्तकी ज्ञानापलीकडची शाळा! अशोक सोनवणे गुरुजींनी घडविले ३००० हून अधिक बालकलाकार

Satara News: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी येताच काळाचा घाला, ८ तासांची चिमुकली पित्याच्या अंत्यदर्शनासाठी | Sakal News

Pune News: इमारतीवरून तोल गेल्याने मुलाचा मृत्यू; पतंग उडविताना कात्रजमध्ये घटना, बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा!

Solapur University: शॉकिंग अपडेट! पुण्यश्लोक होळकर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब; संशोधनातील आकडे पाहून थक्क व्हाल

Crime News : नोटाबंदीनंतरही ४०० कोटींच्या जुन्या नोटा? घोटी पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT