Pathaan  esakal
मनोरंजन

Pathaan Row : 'कोण आहे शाहरुख खान?' आसामच्या मुख्यमंत्र्यांचा प्रश्न! फॅन्सचं जबरी उत्तर

बऱ्याच दिवसांपासून शाहरुखच्या पठाणवरुन वाद सुरु झाला आहे. त्यामध्ये अभिनेत्री दीपिकानं परिधान केलेली भगव्या रंगाची बिकीनी ही वादाचे कारण ठरली होती.

सकाळ डिजिटल टीम

Shah Rukh Khan Pathaan : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा पठाण या आठवड्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याचा वाद हा भलताच पेटला आहे. काही राज्यांनी तर या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आसाम या राज्यांचा समावेश आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

बऱ्याच दिवसांपासून शाहरुखच्या पठाणवरुन वाद सुरु झाला आहे. त्यामध्ये अभिनेत्री दीपिकानं परिधान केलेली भगव्या रंगाची बिकीनी ही वादाचे कारण ठरली होती. त्याला धार्मिक आणि राजकीय रंग देण्याचे काम केले जात असल्याचे दिसून आले आहे. शाहरुखला तर अयोध्येतील एका महंतांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता.

Also Read - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

मध्यप्रदेशातील गृहमंत्र्यांनी देखील शाहरुखच्या विरोधात भूमिका घेतली होती. हिंदू धर्माला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा प्रयत्न यानिमित्तानं केला गेल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमांची प्रतिक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ती चर्चेतही आली आहे. पठाण प्रदर्शित होण्यासाठी अवघ्या तीन दिवसांचा कालावधी राहिला असताना त्यावरील वाद संपण्याचे काही नाव घेत नाही.

Pathaan

हिमंत सरमांचे ते विधान शाहरुखच्या चाहत्यांच्या मनाला लागले आहे. त्यांना एका पत्रकार परिषदेमध्ये विचारले की, पठाण या चित्रपटावर तुमचे म्हणणे काय आहे, त्यावर ते म्हणाले, मला शाहरुख खान कोण आहे हे पहिल्यांदा सांगा, त्यांचे हे उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी देखील हिमंत यांना जशास तसे उत्तर दिले आहे.

एका नेटकऱ्यानं म्हटले आहे की, आसामच्या मुख्यमंत्र्यांचे जनरल नॉलेज बाकी भन्नाट आहे. त्यांना शाहरुख माहिती नाही म्हणजे काय, दुसऱ्यानं लिहिलं आहे की, तुम्ही त्या शाहरुखचा पार कचरा करुन टाकला आहे. हिमंत यांचे ते वक्तव्य सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Pathaan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT