Shahrukh Khan Google
मनोरंजन

Pathaan: 'गर्लफ्रेंड नाही तर कोणासोबत पाहू पठाण?'; चाहत्याला शाहरुखनं दिलेलं सोल्युशन एकदा वाचाच

येत्या २५ जानेवारीला शाहरुखचा 'पठाण' रिलीज होतोय. त्यानिमित्तानं किंग खाननं #AskSRK सेशन अंतर्गत सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला.

प्रणाली मोरे

Pathaan: किंग खानचा 'पठाण' २५ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. हा एक स्पाय थ्रिलर सिनेमा आहे. दीपिका पदूकोणसोबत शाहरुख या सिनेमात रोमॅंटिक अंदाजात दिसणार आहे.

तर जॉन अब्राहम सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या रिलीजला केवळ तीन दिवस बाकी आहेत आणि शाहरुख खानचे चाहते पूर्ण तयारीनिशी हा सिनेमा पहायला उत्सुक आहेत. परदेशात तर अनेक ठिकाणी थिएटर्स हाऊसफुल्ल झाले आहेत.

शाहरुख खानच्या चाहत्यांनी पहिल्यापासूनच सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग केलं आहे. शाहरुखच्या एका फॅन पेजनं तर पूर्ण थिएटरच बूक केलं आहे. आता उत्सुकता आहे शाहरुखचा 'पठाण' बॉक्सऑफिसवर किती झंझावात निर्माण करतोय याची.(Shah rukh Khan pathaan special asksrk session fans interaction)

सिनेमाच्या रिलीज आधी तीन दिवस शाहरुखनं चाहत्यांचे आभार मानायला आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ट्वीटरवर #AskSRK सेशन घेतलं होतं.

या सेशन अंतर्गत शाहरुखनं चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. एका चाहत्यानं शाहरुखला म्हटलं की,''त्याच्याजवळ गर्लफ्रेंड नाही तर तो 'पठाण' सिनेमा कोणासोबत पहायला जाईल'.

यावर शाहरुखनं उत्तर देताना लिहिलं की,''गर्लफ्रेंड करण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलं आहे''. एवढंच नाही,एका चाहत्यानं तर शाहरुखला पठाण सिनेमात दिसणाऱ्या त्याच्या अॅब्स संदर्भातही भन्नाट प्रश्न केला.

पठाण सिनेमात शाहरुख खान ८ पॅक एब्जमध्ये नजरेस पडतो. किंग खाननं देखील मागे यासाठी आपण किती आणि कशी मेहनत घेतलीय याविषयी सांगितलं होतं. त्या चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुखनं लिहिलं की अॅ ब्स पाहून तुम्हाला मी किती मेहनत घेतलीय यावर हे कळलं असेलच.

याव्यतिरिक्त एका नेटकऱ्यानं शाहरुखला पठाण सिनेमा कसा आहे याविषयी विचारलं. म्हणजे नेटकऱ्यानं सरळ किंग खानला पठाणचा रिव्ह्यू विचारला.

यावर शाहरुख म्हणाला की,''आम्ही क्रिएटर आहोत,क्रिटिक्स नाही. दोन्ही कामं खूप वेगळी आहेत. सिनेमासाठी मी इतका उत्सुक आहे तेव्हा समजून जा सिनेमा कसा बनला असेल...''

'पठाण' सिनेमा रीलिज आधीच चर्चेत आला आहे ते सिनेमातील वादग्रस्त 'बेशरम रंग' गाण्यामुळे. यातील दीपिका पदूकोणच्या भगव्या रंगातील बिकिनीवरनं जोरदार वाद पेटला होता.

राजकीय नेत्यांनीही या वादात उडी घेत थिएटरमध्ये पठाण रिलीज होऊ देणार नाही अशा अनेक धमक्याही शाहरुखला दिलेल्या आपण पाहिल्या असतील. पण इतकं सगळं होऊनही किंग खाननं शांत राहणं पसंत केलं आणि आता 'पठाण' च्या रिलीजसाठी तो सज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT