shah rukh khan  Sakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: अंबानींच्या कार्यक्रमात पठाणने वरुण-रणवीरसोबत केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ व्हायरल

नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरच्या कार्यक्रमात शाहरुख खानसह वरुण धवन आणि रणवीर सिंगने झूम जो पठानवर डान्स केला.

सकाळ डिजिटल टीम

नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात पहिल्या दिवसापासूनच सर्व स्टार्स दिसले. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननेही पहिल्या दिवशी संपूर्ण कुटुंबासह कार्यक्रमात सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशीही तो तेथे हजर झाला. त्या काळात शाहरुखने खूप धमाल केली आहे.

असे सांगितले जात आहे की शाहरुखला अंबानी कुटुंबाच्या वतीने परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते आणि शाहरुखने मंचावर चांगलीच रंगत आणली. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पठाण चित्रपटातील झूम जो पठाण हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर लोक त्याच्या स्टेप्सवर रील व्हिडिओ तयार करत आहेत. त्याचवेळी अंबानींच्या कार्यक्रमात शाहरुख या गाण्यावर परफॉर्म करताना दिसला

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी शाहरुखने हा परफॉर्मन्स दिला आहे. त्याचवेळी त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि रणवीर सिंग देखील दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये शाहरुख शेरवानी परिधान केलेला स्टेजवर दिसत आहे. त्याच्यासोबत वरुण धवन आहे. त्यानंतर तो रणवीर सिंगलाही स्टेजवर बोलावतो. मग झूमे जो पठानवर तिघेही अतिशय जोमाने नाचतात.

तिथे उपस्थित सर्व लोक हा सुंदर क्षण आपल्या फोनमध्ये कैद करताना दिसत आहेत. आणि किंग खान डीडीएलजे चित्रपटातील सिग्नेचर पोज परफॉर्मेंसचा शेवट करतो. वरुण आणि रणवीरनेही त्यांच्यासोबत पोज दिली.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीही शाहरुखने त्याच्या लूकमुळे बरीच चर्चा केली होती. तो फुल ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत होता आणि खूप डॅशिंग दिसत होता, जे पाहून सोशल मीडियावर चाहत्यांना विश्वास बसत नव्हता की तो 57 वर्षांचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

Who is Rajan Patil : अजित पवारांचा डाव उधळणारा पठ्ठ्या! अनगरच्या रणांगणातून राजकीय ठिणगी पेटवणारे राजन पाटील कोण?

Viral Video: मलायका अरोराचा हटके स्टंट! स्पर्धकाच्या डोक्यावर ठेवला गॅस, अन् बनवला चहा, व्हिडिओ चर्चेत

Rahul Gandhi: ''राहुल गांधी निवडणूक आयोगाला बदनाम करत आहेत'', देशातल्या 272 दिग्गजांनी लिहिलं खुलं पत्र

Maharashtra CET Exam: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता CET परीक्षा वर्षातून तीनदा होणार, वाचा नवीन नियम

SCROLL FOR NEXT