Dunki trailer: Esakal
मनोरंजन

Dunki trailer: कहानी मैंने शुरू की तो..... हसता हसता रडवून जाणाऱ्या 'डंकी'चा ट्रेलर रिलिज! किंग खान पुन्हा नव्या रुपात

शाहरुखच्या बहुप्रतिक्षित डंकी' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Vaishali Patil

Shah Rukh Khan's Dunki Trailer Out:   बॉलिवूड किंग शाहरुख खान हा सध्या त्याच्या डंकी चित्रपटामुळे चर्तेत आहे. या चित्रपटातील गाणी आणि टिझर रिलिज झाल्यानंतर आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा होती. चित्रपटातील दोन्ही गाण्यांना आणि टिझरला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज केला आहे.

काल सोशल मिडियावर फक्त 'डंकी'च्या ट्रेलरची चर्चा सुरू होती. तर आताही डंकी' सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. अखेर शाहरुखच्या बहुप्रतिक्षित 'डंकी' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

ट्रेलरची सुरुवात 90 च्या दशकात दिसणाऱ्या शाहरुख सारखी होते. अगदी दिलवाले दुल्हनिया ले जाएगे मधल्या राज सारखाच. यात त्याच्या मित्रांचीही ओळख मजेशीर पद्धतिने करण्यात आली आहे. हार्डी आणि त्याचे चार मित्र यांना जायचे आहे परदेशात. मात्र त्यांच्याकडे आवश्यक असणारी कागदपत्रे आणि कौशल्य नाहीत. त्यामुळे तो बेकायदेशीर मार्गाने त्यांना परदेशात पाठवण्याचे ठरवतो.

ट्रेलरमध्ये शाहरुख मित्रांसोबतचे मजेशीर आयुष्य जगतोय, तापसी पन्नू म्हणजेच ​​मन्नू रोमान्स करताना दिसतोय. ट्रेलरमध्ये कॉमेडी सीन्स तुम्हाला हसवतात तर अनेक सीन्स तुम्हाला भावूकही करतात. मात्र यात एक ट्विस्टही आहे जो तुम्हाला ट्रेलर पाहिल्यानंतर दिसतो.

'डंकी'मध्ये शाहरुख आणि तापसीची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. दिया मिर्झा आणि बोमन इराणी यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

या चित्रपटात धर्मेंद्र आणि सतीश शाह, विकी कौशल आणि काजोल देखील दिसणार आहेत. राज कुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शाहरुखची पत्नी गौरी खान आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे.

'डंकी'ची घोषणा 19 एप्रिल 2022 रोजी करण्यात आली होता. याद्वारे शाहरुखने पहिल्यांदाच हिराणीसोबत काम केले आहे. हा सिनेमा 22 डिसेंबरला रिलिज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: संदीप क्षीरसागरांना गळाला लावण्यासाठी अजित पवारांचे जोरदार प्रयत्न? एका दगडात दोन पक्षी टिपण्याचा डाव

Pune News : औषधांची ऑनलाइन, बेकायदेशीरपणे विक्री; औषध विक्रेत्या संघटनांची बंदी घालण्याची मागणी

Eknath Shinde: विरोधकांच्या विरोधाची हंडी जनतेने फोडली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शरसंधान

Yermala News : संपूर्ण धाराशिव जिल्हा अतिवृष्टीने प्रभावीत झाला असताना राज्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा वाशी दौरा दुटप्पी पणाचा

Latest Maharashtra News Updates : मुंबईत दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा जखमी; केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार, काहींची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT