srk 
मनोरंजन

सलमानच्या 'प्यार करोना' गाण्यावर शाहरुखची कोपरखळी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- बॉलीवूडवर कित्येक वर्षांपासून राज करणारे शाहरुख खान आणि सलमान खान सध्या आपापल्यापरिने कोरोना व्हायरसच्या संकटातून बचाव करण्यासाठी जनजागृती आणि मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत..याच कोरोना व्हायरसबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सलमान खानने नुकतंच त्याचं युट्युब चॅनल लॉन्च करत त्यावर स्वतःच्या आवाजातलं प्यार करोना हे पहिलं गाणं पोस्ट केलं होतं..अनेकांनी सलमानच्या या गाण्याला चांगला प्रतिसाद दिल्यानंतर शाहरुखननेही यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे..

आज शाहरुख खानने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरुन #AskSRK सेशन केलं..या दरम्यान त्याच्या चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले..यातील एका चाहत्याने शाहरुखला सलमानचं नुकतंच रिलीज झालेलं प्यार करोना गाणं पाहिलं का? असा प्रश्न विचारला..चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर देत शाहरुखने लिहिलं, 'भाई कमाल सिंगल आणि सिंगर आहे'..शाहरुखच्या या कमेंटवरुन तरी त्याने हे गाणं पाहिल्याचं कळतंय..

शाहरुख त्याच्या या मजेशीर अंदाजासाठी चांगलाच प्रसिद्ध आहे..तो नेहमीच त्याच्या सहकलाकारांसोबत देखील सेटवर मजामस्ती करत असतो..आता शाहरुखची अशी कोपरखळी लगावणारी प्रतिक्रिया पाहिल्यानंतर भाईजान कसा रिऍक्ट होतोय याचीच सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत..

'प्यार करोना' हे गाणं सलमान खान आणि हुसैन दलाल यांनी मिळून लिहिलेलं आहे तर याला संगीत साजिद वाजिद यांनी दिलं आहे.. सलमानने कोरोनो व्हायरसमुळे झालेल्या या लॉकडाऊनमध्ये घराबाहेर न पडता आपण आपला वेळ कोणकोणत्या प्रकारे योग्य मार्गी लावू शकतो हे स्वतःच्या आवाजात गाऊन सांगितलं आहे..यासोबतंच खासकरुन हा मिळालेला वेळ कुटुंबियांसोबत घालवण्याचा सल्लाही त्याने चाहत्यांना यातून दिला आहे..  

shah rukh khan reaction on salman khan song pyar karona 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT