Shah Rukh Khan responds to the box office success of Pathaan, says 'hum to khushi ginte hai' sakal
मनोरंजन

Shah Rukh Khan Pathaan: 'पठाण'च्या यशानंतर शाहरूखचं थेट चाहत्यांशी चॅटिंग.. म्हणाला, मी आकडे मोजत..

शाहरुखच्या 'या' उत्तराने चाहते भारावले.. एका बघाच काय म्हणाला 'पठाण'

सकाळ डिजिटल टीम

Shah Rukh Khan Pathaan: बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानचे आता हवेत आहे असं म्हटलं तर वावगं नाही, शाहरूख खानचा चित्रपट प्रदर्शित होऊन केवळ तीन दिवस झाले आहेत आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले आहेत.

पठाणने अवघ्या तीन दिवसात 300 कोटी कमावले. या यशानंतर शाहरुख खानने आपल्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी #AskSRK ट्विटरवर आणले आणि थेट चाहत्यांशी संवाद साधला..

(Shah Rukh Khan responds to the box office success of Pathaan, says 'hum to khushi ginte hai')

अनेक वादविवादा नंतर पठाण चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. शाहरुख खान नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव असतोच आता परत त्यांनी चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर उत्तरे दिली आहे.

शाहरुखने प्रत्येक वेळी प्रमाणेच त्यांच्या मजेशीर प्रश्नांना अचूक उत्तरे देऊन चाहत्यांची मने जिंकली. तर उशीर कशासाठी, चला तर पाहूया शाहरुख खानला चाहत्यांनी चित्रपट आणि वैयक्तिक पातळीवर कोणते प्रश्न विचारले.

'पठाण'चा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड पाहून एका चाहत्याने विचारले, 'हे रेकॉर्ड पाहिल्यानंतर तुम्हाला कसे वाटते?' त्यावर शाहरुख म्हणाला, 'हा हा मला आता गावी परत जावंसं वाटतंय'.

एका चाहत्याने विचारले की #SRK 'पठाण' चित्रपटाचे कलेक्शन पाहून कसे वाटते? त्यावर शाहरुख मजेशीर उत्तर देत म्हणाला, 'भाई नंबर फोन के होते हैं, हम तो खुशी गिनते हैं'. त्याच्या या उत्तराने चाहते अक्षरशः वेडे झाले.

या चित्रपटातील सलमान खान आणि शाहरुख खानची जोडी चाहत्यांना खूप आवडली आहे. या जोडीने 'करण अर्जुन'ची आठवण करून दिली.

एका चाहत्याने विचारले, 'सर, ट्रेनच्या सीनमध्ये छैय्या छैय्यारही सलमान सरांसोबत तुम्ही डान्स केला असेल.' याला उत्तर देताना शाहरुखने लिहिले की, 'भाई, त्याने जमेल तेवढे केले आहे, आता तुम्हाला काय कळणार..'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT