Shah Rukh Khan Sakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: शाहरुखनं दिला सुखी वैवाहिक जिवनाचा मुलमंत्र म्हणाला, "जर तुम्ही..."

'पठाण' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुख ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी सतत जोडला जातो.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा पठाण म्हणजेच शाहरुख खानने 'पठाण' चित्रपटाद्वारे चार वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. यामुळेच या अभिनेत्याच्या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले. त्याचबरोबर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुख ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी सतत जोडला जातो.

अलीकडेच, त्याने पुन्हा एकदा Ask SRK सेशन आयोजित केले होते. ज्यामध्ये एका चाहत्याने शाहरुखला त्याच्या चांगल्या वैवाहिक आयुष्याचे रहस्य विचारले, ज्याला अभिनेत्याने मनाला आनंद देणारे उत्तर दिले.

सोमवारी शाहरुखने त्याच्या चाहत्यांसाठी आस्क एसआरके सेशन ठेवले. ज्यामध्ये अभिनेत्याच्या चाहत्याने त्याला हॅप्पी मॅरिड लाइफचे रहस्य विचारले. फॅनने विचारले, 'तुमच्या चांगल्या वैवाहिक आयुष्याचे रहस्य काय आहे?

#AskSRK" यावर उत्तर देताना शाहरुखने लिहिले, "गौरीचे हृदय आणि मन खूप चांगले आहे...तिने आमच्या सर्वांना कुटुंब आणि प्रेमाच्या चांगुलपणावर विश्वास दिला आहे." शाहरुखचे हे उत्तर ऐकून चाहते त्याच्यावर खूप प्रभावित झाले आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

25 जानेवारीला रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने देशातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट लवकरच जगभरात 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन इब्राहिम देखील दिसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा

Satara Child Marriage: कुमारवयातच वाढतेय संसाराचे ओझे; प्रेमाच्या आड ‘छुप्या बालविवाहा’चे सातारा जिल्ह्यात वाढताहेत प्रकार, संकटाची चाहूल!

SCROLL FOR NEXT