Shah Rukh Khan, Salman Khan, Hrithik Roshan Google
मनोरंजन

शाहरुख,सलमान,हृतिक स्पाय थ्रीलरसाठी एकत्र?

पठाण,टायगर,कबिर या आपल्या आवडत्या व्यक्तीरेखांना एकत्र आणण्यासाठी आदित्य चोप्रा उत्सुक

प्रणाली मोरे

एकाच सिनेमात शाहरुख(Shahrukh Khan),सलमान(Salman Khan),हृतिक(Hrithik Roshan) या तिघांना एकत्र पाहणं म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. म्हणूनच या तीन मोठ्या अभिनेत्यांना एकत्र आणण्यासाठी आपल्या भेटीस येत आहे आदित्य चोप्रा निर्मित स्पाय थ्रीलर. बोललं जातंय की सिनेमात शाहरुख हा पठाण म्हणून,सलमान हा टायगर तर हृतिक हा कबिर या व्यक्तीरेखांमधून एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आता यात किती तथ्य आहे हे मात्र अजून कळायचं बाकी आहे. पण बोललं जात आहे की,या वर्षात हृतिकचा 'War 2' सिनेमा येऊन गेल्यानंतरच हा स्पाय थ्रीलर भेटीला येऊ शकतो.

पण शाहरुख,सलमान,हृतिक एकत्र एकाच सिनेमात काम करण्यासाठी तयार होतील का हाच प्रश्न आहे. शाहरुख सध्या 'पठाण'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमानने कतरिना कैफसोबत नुकतच 'टायगर 3' चे शूटिंग पूर्ण केले आहे तर हृतिकच्या 'War2' सिनेमाचीही लवकरच या नविन वर्षात घोषणा होईल. त्यानंतर या तिघांना त्यांच्या या प्रसिद्ध व्यक्तीरेखांच्या माध्यमातून आदित्य चोप्रा स्पाय थ्रीलर सिनेमातून एकत्र आणणार आहे. हा सिनेमा आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेवर भाष्य करणारा असेल. ज्यामध्ये आदित्य चोप्राच्या या तीन व्यक्तीरेखा स्पाय एजेंट बनून एकमेकांसमोर उभे राहतील. पण हे खरंय का? सध्या तरी यात काही तथ्य वाटत नसलं तरी भविष्यात हे घडू शकेल हे सुद्धा आपण नाकारू शकत नाही. सूत्रांच्या सांगण्यावरुन कळतंय की,अजूनही आदित्य चोप्रा संभ्रमात आहे की या तीन सुपरस्टार्सना पठाण,टायगर आणि कबिर या व्यक्तीरेखांच्या माध्यमातून आपण कसे एकत्र आणू शकतो. आदित्य चोप्राने आपल्या 'पठाण' आणि टायगर या दोन व्यक्तिरेखांना एकत्र आणण्याची किमया केलीच आहे. म्हणजे शाहरुखच्या 'पठाण' सिनेमात सलमान खान 'टायगर' म्हणून पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे; तर सलमानच्या 'टायगर 3' सिनेमातही शाहरुखला 'पठाण' म्हणून आदित्य चोप्राने काही वेळापुरता आणले आहे,आणि पठाण-टायगर या आपल्या दोन तगड्या व्यक्तीरेखांची एकत्र भेट पडद्यावर घडवून आणण्याची जादू केली आहे. पण आता राहिला आहे आदित्य चोप्राचा आणखी एक फेव्हरेट,तो म्हणजे ' War' मधला 'कबिर'. जो याआधी पठाण,टायगरला भेटलेला नाही.

आणि हेच घडवून आणण्यासाठी आदित्य चोप्रा कदाचित 'War2' ची आधी निर्मिती करणार असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यानंतरच याचा एन्ड तो असा करणार आहे ज्याची लिंक त्याच्या पुढील स्पाय थ्रीलर सिनेमाला जोडली जाईल. कारण तो आगामी स्पाय थ्रीलर सिनेमा पाहताना लोकं आतुर झालेले असतील या तीन लिजेंड्सना एकत्र पाहण्यासाठी. त्यामुळे ते परफेक्ट सगळं घडून आलं पाहिजे,इंटरेस्टिंग सारं व्हायला हवं यासाठी जोरदार तयारी कथानकावर सुरू आहे. आता आपण मात्र वाट पाहायची,कधी सगळं जुळून येतंय याची. सिनेमात दिपिका पदूकोण आणि कतरिना कैफ दोन अभिनेत्री दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता इतके सगळे मोठे स्टार सिनेमात एकत्र दिसणार म्हणजे चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानीच असणार नाही का.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT