Shah Rukh Khan 
मनोरंजन

Shah Rukh Khan : 'जशी करणी तशी...'! वानखेडेंवर EDची कारवाई होताच, शाहरुखचं 'ते' ट्विट व्हायरल

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या त्या क्रुझमध्ये सुरु असणाऱ्या पार्टीमध्ये ड्रग्जचा समावेश असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती.

सकाळ डिजिटल टीम

Shah Rukh Khan Sameer Wankhede Raided Karma Tweet : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा आता पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी त्याच्या मुलाला आर्यन खानला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एनसीबीनं अटक केली होती. समीर वानखेडे या अधिकाऱ्यानं ही कारवाई केली होती. आता त्याच अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्यानं किंग खानचं ते ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या त्या क्रुझमध्ये सुरु असणाऱ्या पार्टीमध्ये ड्रग्जचा समावेश असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानंतर त्या क्रुझवर छापा टाकण्यात आला होता. त्यामध्ये बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला आर्यन खानला अटक करण्यात आली होती. साऱ्या देशाचे लक्ष त्या घटनेकडे लागले होते. माध्यमांनी देखील या प्रकरणाकडे लक्ष केंद्रित केल होते. यासगळ्यात चर्चेत होते कारवाई करणारे अधिकारी समीर वानखेडे.

समीर वानखेडे यांनी वैयक्तिक आकसापोटी ही कारवाई केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचे दिसून येते होते. अशातच आता भ्रष्टाचाराच्या आरोप झाल्याप्रकरणी समीर वानखेडेंवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यानंतर किंग खान शाहरुखचे जुने व्टिट पुन्हा एकदा व्हायरल झाले असून त्यामध्ये शाहरुखनं कर्मा थिएरीचे उदाहरण दिले होते. त्यावरुन नेटकऱ्यांनी वानखेडे यांच्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आर्यन खानला कोर्टानं दिलासा दिला. त्यानंतर वानखेडे यांची बदली करण्यात आली होती. यासगळ्यात वानखेडे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर पुन्हा ते ट्विट चर्चेत आले आहे. तुम्ही जसे काम करता तसेच फळ तुम्हाला मिळते. अशा आशयाचे ते ट्विट असून ते वानखेडे यांना टॅग करण्यात आले आहे. शाहरुखनं त्याच्या आस्क एसआरके मध्ये २० फेब्रुवारीला पठाणच्या निमित्तानं एक व्टिट केले होते. त्यावेळी शाहरुखनं तुम्ही जसे कर्म करता तसे तुम्हाला फळ मिळते. अशा शब्दांत उत्तर दिले होते.

आता वानखेडेंवर कारवाई झाल्यानंतर शाहरुखचे ते तीन महिन्यांपूर्वीचे ट्विट व्हायरल झाले आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहेत. मात्र त्यामुळे अनेकजण गोंधळूनही गेले आहेत. शाहरुखनं वानखेडेंवर झालेल्या कारवाईवरुन तर हे ट्विट केले नाही ना असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT