shah rukh khan  google
मनोरंजन

Shah Rukh Khan : ५६ व्या वर्षीही तब्येत अशी की पाहून डोळे फिरतील..

बॉलीवूड अभिनेता शाह रुख खान याने 'PATHAN' चित्रपटासाठी केलेला लूक व्हायरल झाला असून त्याच्या 8 pack abs ची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

नीलेश अडसूळ

BOLLYWOOD : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाह रुख खान (shah rukh khan) याच्या 'पठाण' (pathan) या चित्रपटाची भलतीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. त्यावेळी दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या कामाची बरीच चर्चा झाली होती. या चित्रपटात बॉलिवूडचे अनेक तारे प्रमुख भूमिकेत असल्याने हा चित्रपट रिलीज होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या चित्रपटात शाहरुख खान कसा दिसत असेल याची उत्सुकता अनेकांना होती. आणि अखेर त्याचे उत्तर स्वतः शाहरुखने समाज माध्यमांवर येऊन दिले आहे. 'पठाण' चित्रपटासाठी त्याने खास 8 pack abs बनवले आहे. नुकताच त्याने स्वतःचा शर्टलेस होतो समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे. यामध्ये 'पठाण' चित्रपटातील शाहरुख पाहायला मिळाला नसला तरी त्या भूमिकेसाठी त्याने घेतलेली मेहनत स्पष्ट होते.

केवळ फोटोच नाही तर या फोटोला शाहरुखने दिलेल्या कॅप्शने देखील अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ''एक वेळ शाहरुख थोडा थांबलेही पण पठाणला कसे थांबवाल'' अशा शब्दात त्याने चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. केवळ चित्रपटच नाही तर पुढे त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयीही तो लिहिता झाला आहे. ''अॅप्स आणि ऍब्स बनवणार'' असे त्याने म्हंटले आहे. शाहरुख खान लवकरच स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म आणणार आहे. ज्याचे नाव आहे 'SRK Plus' असून डिस्ने प्लस (hotstar) हॉटस्टारसोबत याचे प्रमोशन करत आहे. 'थोडा रुक शाहरुख' अशी यासाठी टॅगलाइन देण्यात आली आहे.

शाहरुखची पत्नी गौरी खाननेही हा फोटो पोस्ट केला आहे. तर 'माझे वडील ५६ वर्षांचे आहेत. आमच्याकडे कोणत्याही सबबीला थारा नाही' अशा कॅप्शन सह शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने देखील हा फोटो शेअर केला आहे. यासह अनेक कलाकारांनी शाहरुख च्या या नव्या लुक चे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : मराठा आंदोलक जरांगे पाटील बैठकीसाठी बीडला रवाना

SCROLL FOR NEXT