shah rukh khan
shah rukh khan Sakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: किंग खानची खास पोस्ट; चाहत्यांचे आभार मानत म्हणाला...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने चार वर्षांच्या ब्रेकनंतर 'पठाण' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आणि या चित्रपटाने इतिहास रचला. किंग ऑफ रोमान्सचा स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'पठाण' रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.'पठाण'ची रेकॉर्डब्रेक कमाई सुरू आहे.

'पठाण' रिलीजच्या दोन आठवड्यात ब्लॉकबस्टर ठरला आहे. आता पठाण चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल शाहरुख खाननं त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यानं ट्विटरवर एक खास फोटो शेअर करुन चाहत्यांचे आभार मानले.

किंग खानने ट्विटरवर त्याचा एक सेल्फी शेअर केला आहे. या सुंदर सेल्फीमध्ये शाहरुखच्या मागे सूर्यकिरण दिसत आहेत. शाहरुखने हा फोटो शेअर करुन ट्वीटमध्ये लिहिले, 'सूर्य एकटा आहे. तो जळतोय. तो अंधारातून पुन्हा प्रकाशात येतो. पठाणवर एवढं प्रेम आणि चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! '

किंग खानच्या चाहत्यांनी त्याच्या या ट्वीटवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या ट्वीटला 55 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाइक केले आहे. तसेच सात हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी त्याच्या या ट्वीटला रिट्वीट केलं आहे.

जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम करणाऱ्या शाहरुख खानच्या 'पठाण'ची दमदार कामगिरी सुरूच आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 55 कोटींचा विक्रम केला आहे. या चित्रपटाने 12 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई केली.

14 दिवसांमध्ये या 'पठाण' या चित्रपटानं जगभरात 850 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर भारतामध्ये या चित्रपटानं 446.20 कोटींचं कलेक्शन केलं आहे. भारतामध्ये हा चित्रपट 500 कोटीचा टप्पा पार करेल, असा अंदाज लावला जात आहे.

पठाण या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम , आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सलमान खानने देखील कॅमिओ केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT