shah rukh khan tweet for team india after ind vs aus 2023 worldcup final Esakal
मनोरंजन

Ind vs Aus Final: ती सन्मानाची बाब... वर्ल्डकप फायनलनंतर टीम इंडियासाठी शाहरुखची पोस्ट

शाहरुख खानने भारतीय क्रिकेट संघाला धीर दिलाय

Devendra Jadhav

SRK on Ind vs Aus Final:

काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. सामना झाल्यावर भारतीय क्रिकेट टीमचे डोळे पाणावले होते. काल सगळ्या भारतीयांचं स्वप्नभंग झालं. तरीही सर्वजण टीम इंडियाला सपोर्ट करत आहेत.

काल अंतिम सामना पाहायला शाहरुख खानही उपस्थित होता. शाहरुख सहकुटूंब सामना पाहायला आला होता. भारताचा पराभव झाल्यावर शाहरुख खाननेही ट्विट करत टीमला पाठिंबा दिला.

शाहरुखचं भारतीय क्रिकेट संघासाठी खास ट्विट

शाहरुखने X वर लिहीले, "भारतीय संघाने ही संपूर्ण स्पर्धा ज्या प्रकारे खेळली ती सन्मानाची बाब आहे आणि त्यांनी खूप उत्साह आणि चिकाटी दाखवली. हा एक खेळ आहे आणि नेहमीच एक किंवा दोन दिवस वाईट असतात. दुर्दैवाने आज ते घडले….परंतु क्रिकेटमधील आमच्या खेळाचा वारसा तुम्ही असाच पुढे चालू ठेवला त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो…तुम्ही संपूर्ण भारताला खूप आनंद दिला. प्रेम आणि आदर. भारताला तुमचा अभिमान आहे."

शाहरुखच्या त्या कृतीने नेटकरी किंग खानवर खुश

फायनलच्या सामन्यासाठी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी आशाताई पित असलेल्या चहाचा कप शाहरुखने उचलून ठेवला. या कृतीमुळे नेटकऱ्यांनी किंग खानचे कौतुक केले आहे. त्याला नेटकऱ्यांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया देखील चर्चेचा विषय आहे.

फायनलला किंग खान त्याचा मुलगा आर्यन खान, सुहाना, पत्नी गौरी उपस्थित आहे. बॉलीवूडच्या वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी या सामन्यासाठी हजेरी लावल्याचे दिसून आले आहे

अनुष्का शर्माचेही डोळे पाणावले

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर, रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. लाखो भारतीयांप्रमाणेच अभिनेत्री अनुष्का शर्मा, अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटूंच्या कुटुंबातील इतर सदस्यही स्टेडियममध्ये भावूक होताना दिसले. अनुष्का शर्माच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. तिने मिठी मारुन विराटला धीर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT