Shah Rukh Khan unveils first look from Pathan Google
मनोरंजन

'पठाण' मधील शाहरुखचा खतरनाक लूक समोर; रिलीजसाठी आजचा दिवसच का निवडला?

२५ जानेवारी,२०२३ ला 'पठाण' सिनेमागृहात रिलीज केला जाणार आहे.

प्रणाली मोरे

शाहरुख खानच्या(Shahrukh Khan) 'पठाण'(Pathan) सिनेमाची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतिक्षा होती. खूप दिवसांपासून 'पठाण'ची चर्चा सगळीकडेच सुरू होती. असं असलं ती सिनेमातील शाहरुख आणि त्याच्या सहकलाकारांचे लूक मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. पण अखेर २५ जून रोजी शाहरुख खानने बॉलीवूडमध्ये ३० वर्ष पूर्ण केली आहेत. या आनंदाच्या दिवशी किंग खाननं आपल्या 'पठाण' सिनेमाचा लूक रिलीज केला आहे.(Shah Rukh Khan unveils first look from Pathan)

'पठाण' सिनेमात शाहरुख खान एक इंडियन एजंटची भूमिका साकारत आहे. या सिनेमातून त्याचा समोर आलेला पहिला लूक खूपच जबरदस्त आहे. अशा लूकमध्ये याआधी शाहरुख कधीच दिसला नव्हता. सोशल मीडियावर किंग खानने आपलं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. यामध्ये आपण शाहरुखला पायात उंच बूट्स आणि शर्ट-पॅंट घातलेलं पाहू शकाल. हातात बंदूक घेऊन उभा असलेला शाहरुखचा खतरनाक लूक पाहून काही क्षण थोडं भयानक नक्कीच वाटतं. त्याच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर रक्त लागलेलं आहे.

आपल्या लूकला शेअर करताना शाहरुखनं लिहिलं आहे,''३० वर्ष पूर्ण झाली इंडस्ट्रीत,अजून पुढे खूप प्रवास करायचा आहे. कारण तुमचं प्रेम आणि हास्य मला त्यासाठी ताकद देईल. 'पठाण' सोबत या प्रवासाला पुढं नेऊया. २५ जानेवारी,२०२३ ला 'पठाण' येतोय तुम्हाला भेटायला''.

शाहरुख खानने लूक रिलीज झाल्यावर लगेच ट्विटरवर त्याचं नाव ट्रेंडिंग मध्ये आलां. चाहत्यांमध्ये सिनेमाविषयी मोठी उत्सुकता पहायला मिळते आहे. एका नेटकऱ्याने लिहिलंय,'शाहरुख खानचा पठाण लूक क्लासी आहे आणि मासला आवडतोयही. हा पठाण हड्डियां नाही तर रेकॉर्डही तोडणार,ब्लॉकबस्टर लूक'. शाहरुख खानच्या फॅन क्लब पेजवर युजरने लिहिलंय,'या पोस्टरवर ब्लॉकबस्टर लिहिलं आहे,लवकच भेटूया पठाणला'.

'पठाण' सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. याआधी त्यानं हृतिक रोशन-टायगर श्रॉफच्या 'वॉर'चं दिग्दर्शन केलं आहे. शाहरुख खान सोबत 'पठाण' मध्ये दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिका साकारतना दिसणार आहेत. यश राज फिल्म्स बॅनर अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. २५ जानेवारी,२०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सिनेमाला प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा सिनेमा हिंदी,तामिळ,तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

Latest Marathi News Live Update : मंडणगड साईनगर येथे ‘नाना - नानी पार्क’चे लोकार्पण

Jalgaon News : गुलाबी थंडीची प्रतीक्षा संपणार! ७ नोव्हेंबरपासून जळगावात थंडीचा जोर वाढणार, तापमान १७ अंशांपर्यंत खाली येणार

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT