Pathaan WorldWide Collection  Esakal
मनोरंजन

Pathaan Collection: निर्मात्यांचा मास्टर स्ट्रोक अन् 'पठाण'ची कमाई झिंगाट ! लवकरच पुर्ण करणार...

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर पठाण या चित्रपटाची रिलिज आधीही जितकी चर्चा रंगली होती तितकिच चर्चा रिलिजनंतरही सुरु आहे. काही केलं तरी पठाण थांबायला तयार नसल्याचं दिसतयं. चित्रपटाला 26 दिवस उलटून गेले असले तरी चित्रपट बक्कळ कमाई करत आहे. रविवारी पुन्हा एकदा ब्लॉकबस्टर रेकॉर्ड केला आहे. शनिवारी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केल्यानंतर, चित्रपटाने चौथ्या रविवारी म्हणजेच २६व्या दिवशी चांगली उडी घेतली.

पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. शनिवारी 3.32 कोटी कमावले होते तर चौथ्या रविवारी या चित्रपटाची कमाई 4.30-4.50 कोटींच्या दरम्यान आहे.

या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत एकूण 515.72-515.92 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर या चित्रपटाचे जगभरात 988 कोटींचे कलेक्शन केले आहे. चित्रपटाच्या वाढत्या मागणीमुळे स्क्रीनच्या संख्येत वाढ झाली, तर निर्मात्यांनी वीकेंडला तिकिटांचे दरही कमी केले होते. निर्मात्यांनी खेळलेल्या या मास्टर स्ट्रोकचा थेट परिणाम 'पठाण'च्या कमाईवर झाल्याचं दिसून येत आहे.

सिद्धार्थ आनंदचा 'पठाण' हा चित्रपट बऱ्याच वादानंतर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून बराच गदारोळ झाला होता. त्याचबरोबर या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर एसएस राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली 2' आणि RRR , दंगल सारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना होत आला आहे, तरीही क्रेझ कमी होताना दिसत नाही, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT