Jawan Shah Rukh Khan's Jawan ticket price only Rs 60 Kolkata, Delhi, Mumbai, Bengaluru, Chennai esakal
मनोरंजन

Jawan Movie Ticket : शाहरुखच्या 'जवान'चं तिकीट फक्त 60 रुपयांना! कुठं आणि कसं खरेदी करायचं?

Vaishali Patil

Shah Rukh Khan's Jawan Ticket: शाहरुख खानचा बहूप्रतिक्षित 'जवान' हा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानचे चाहते या चित्रपटासाठी खुप उत्सूक आहे. 1 सप्टेंबरपासून जवानाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले होते.

या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा इतका चांगली प्रतिसाद मिळाला की आत्तापर्यंत जवानची कोट्यवधी रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत. लोकांना पहिल्याच दिवशी जवान सिनेमा पहायचा आहे त्यामुळे या चित्रपटाचे बुकिंग काही ठिकाणी फुल झाले आहे.

चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगच्या तिकिटांबद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटाची तिकीटे 500 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत विकली जात आहेत. देशातील बहुतांश मेट्रो शहरांमध्ये 'जवान' च्या तिकिटांच्या किमती खूप जास्त आहेत.

चेन्नई, बंगलोर, दिल्ली, मुंबई या शहरात देखील चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र एकीकडे या चित्रपटाच्या तिकीटाची किंमत हजार रुपयांच्यावर आहे तर दुसरीकडे हा सिनेमा तुम्ही फक्त 60 रुपयांमध्ये पाहू शकणार आहात.

कारण अनेक शहरांतील काही सिनेमागृहांमध्ये तुम्हाला जवानाची तिकिटं खुप स्वस्तात मिळणार आहे.

कोलकात्याच्या एका थिएटरमध्ये जवानचं तिकीट अवघ्या 60 रुपयांमध्ये देण्यात येत आहे. कोलकात्याच्या बारासात येथील लाली सिनेमागृहात अवघ्या 60 रुपयांना ही तिकीट विकली जात आहे. त्याचबरोबर चित्रपटगृहातील बाल्कनीतील तिकिटे केवळ 80 रुपयांना विकली जात आहेत.

केवळ लाली सिनेमागृहातच नाही तर पद्मा आणि बारापूर चित्रपटगृहातही चित्रपटाचे तिकिटाचे दर केवळ 60 रुपये आहे. बसुश्री चित्रपटगृहात जवानची तिकीटे 100 आणि 150 रुपयांना विकली जात आहे.

तर मुंबईत डोंगरी भागातील प्रमियर गोल्ड सिनेमागृहातही जवानची तिकीट खुप कमी किमतीत विकली जात आहे. स्टॉल सीट्ससाठी 100 रुपये आणि सर्कल सीट्सचे तिकिटे 112 उपलब्ध आहेत. तर चैन्नईतील एजीएस चित्रपटगृहात जवानचं तिकीट 65 रुपयात आहे तर दिल्लीतील शक्ति नगर परिसरातील अम्बा चित्रपटगृहांमध्ये जवानच्या तिकीटाचे दर हे 70 ते 80 रुपयांना उपलब्ध आहे.

शाहरुखच्या जवानमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, नयनतारा, विजय सेतुपती आणि सुनील ग्रोव्हर देखील दिसणार आहेत. 'पठाण' नंतर 'जवान' हा शाहरुखचा दुसरा चित्रपट आहे. 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा उभारतानाची दृष्य! पुण्यातील १९२८ ची ऐतिहासिक मिरवणूक, ९७ वर्षांनंतरही... Video पाहा

Gold Rate Today: सोने झाले आणखी स्वस्त, चांदीचीही चमक उतरली, तुमच्या शहरात १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव काय? जाणून घ्या

Ranji Trophy: "मुंबईचा रणजीत धडाका! सहाशे धावांचा डोंगर; सिद्धेशचे दीडशतक, सर्फराझ, शार्दुलचीही अर्धशतके

Teachers Suspended:'अहिल्यानगरमधील दोन परित्यक्ता शिक्षिका निलंबित';बदलीसाठी माेठा बनाव, शिक्षण क्षेत्रात खळबळ..

Female Aggressive:'ग्रामस्थ-वनअधिकाऱ्यांत रणकंदन'; नगर तालुक्यातील महिला आक्रमक, पकडलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारा

SCROLL FOR NEXT