Shah Rukh Khan's Jawan will have its first show at 6 am in mahim Gaiety Cinema SAKAL
मनोरंजन

Jawan: शाहरुख खानच्या जवानची जोरदार चर्चा! मुंबईतील 'या' सिनेमागृहात जवानचा पहाटे ६ ला पहिला शो होणार

मुंबईत या सिनेमागृहाच जवानचा पहिला शो लागणार आहे

Devendra Jadhav

Jawan: शाहरुखच्या जवानची उत्कंठा शिगेला आहे. जवान सिनेमाने भारतच नव्हे तर जगभर स्वतःची चांगलीच हवा निर्माण केलीय. शाहरुखचा जवान सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमा रिलीज व्हायला आठवडा बाकी आहे. आणि शाहरुखच्या जवानची मुंबईत क्रेझ बघायला मिळते. जवानचा मुंबईत पहाटे ६ वाजता पहिला शो लागणार आहे.

(Shah Rukh Khan's Jawan will have its first show at 6 am in mahim Gaiety galaxy Cinema)

मुंबईत या थिएटरमध्ये जवानचा पहाटे ६ ला शो

मुंंबईतील गैटी गॅलॅक्सी सिनेमागृहात जवानचा पहिला शो लागणार आहे. सोशल मीडियावर SRK फॅनक्लब्सने याविषयी माहिती दिली, "आम्ही जवान निमित्ताने इतिहास रचतोय कारण पठाण हा ५१ वर्षात प्रतिष्ठित गैटी थिएटरमध्ये सकाळी 9 वाजता शो होणारा पहिला चित्रपट बनला होता. आता पुन्हा एकदा Gaiety Galaxy येथे प्रीमियर साजरा करत असताना जवान निमित्ताने पुन्हा इतिहास घडवूया. चला जवानचा पहाटे 6 वाजता पहिला शो आयोजित करूया."

'नॉट रमैया वस्तावैया' जवान मधलं पहिलं गाणं

शाहरुखच्या जवाननधलं नॉट रमैया वस्तावैया हे गाणं भेटीला आलंय. या गाण्यात शाहरुख विविध गेटअपमध्ये नाचताना दिसतोय.

शाहरुख खानच्या जवान मधल्या नॉट रमैया वस्तावैया गाण्यात शाहरुख आणि नयनतारा तुफान नाचताना दिसत आहेत. दोघांची लाजवाब केमिस्ट्री डान्समध्ये झळकत आहे.

शाहरुखच्या जवानचा अमेरिकेत ऐतिहासीक रेकॉर्ड

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच येणार आहे. आज सोमवार, २८ ऑगस्ट रोजी निर्माते 'जवान'चा ट्रेलर रिलीज करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅटली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात शाहरुख खान आतापर्यंतच्या सर्वात अनोख्या अवतारात दिसणार आहे.

करण जोहरने इंस्टाग्रामवर ट्रेलर पाहिला आणि त्याला 'शतकातुन एकदाच निर्माण होणारा ट्रेलर' असे कॅप्शन दिलंय. या सगळ्यात 'जवान'ने आगाऊ बुकिंग करून इतिहास रचला आहे. अमेरिकेत, चित्रपटाने पहिल्या दिवसासाठी $225K म्हणजेच 1.85 कोटी रुपयांची आगाऊ बुकिंग केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT