Shah Rukh Khan’s Mannat name plate worth Rs 25 lakhs goes missing? 
मनोरंजन

शाहरुखच्या 'मन्नत'ची २५ लाखाची नवीन नेमप्लेट गायब; चोरली की काढली?

शाहरुखच्या बंगल्या बाहेरील या नेमप्लेटसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते रोज गर्दी करताना दिसायचे.

प्रणाली मोरे

शाहरुख खानचा(Shahrukh Khan) 'मन्नत' (Mannat) बंगला हा गेली अनेक वर्ष चर्चेत आहे. अर्थात इथे चाहते त्यांच्या लाडक्या अभिनेत्याला पहायला नेहमी गर्दी करताना दिसतात. किंवा मग शाहरुख नसला तरी त्याच्या बंगल्याला भेट देणं म्हणजे त्यांच्यासाठी स्थलदर्शनही असतं. त्याच्यासोबत सेल्फी काढणं हा एक मोठा ध्यास असतो चाहत्यांचा. पण आता या बंगल्यासोबतच तिथे प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली नवी नेमप्लेटही(Nameplate) चर्चेत आली अन् तिच्यासोबत सेल्फी काढणं हा चाहत्यांना एक छंदच जडून गेला. खरंतर 'मन्नत'च्या या नवीन युनिक नेमप्लेटविषयी शाहरुखच्या चाहत्यांनीच सोशल मीडियावर खबर दिली होती.

पण आता ही नेमप्लेट अचानक गायब(Missing) झाल्याची बातमी फोटोसाबत चाहत्यांनीच शेअर केली आहे. नेहमीप्रमाणे काही चाहते शाहरुखच्या बंगल्याच्या या नवीन युनिक नेमप्लेटसोबत फोटो काढायला गेले होते तेव्हा त्यांना ही नेमप्लेट गायब झाल्याचं कळालं अन् नाराज झालेल्या चाहत्यांनी थेट आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्या नेमप्लेटच्या रिकाम्या जागेचा फोटोच शेअर केला आहे. अन् अनेकांना वाटलं की २५ लाखाची डायमंड बसवलेली ही नेमप्लेट कुणीतरी चोरली. पण आता या नेमप्लेटच्या गायब होण्यामागची नवी खबर कानावर पडत आहे.

म्हटलं जातंय की, या २५ लाखाच्या किमतीच्या नेमप्लेटमध्ये काही डायमंड बसवले होते. त्यातील काही डायमंड पडल्यानं त्याचा लूक बिघडला होता. म्हणूनच गौरी खानं जिनं स्वतः तिला डिझाईन करून घेतलं होतं तिनं ते डायमंड पुन्हा बसवून त्या नेमप्लेटची दुरुस्ती करुन घेण्यासाठी आपल्या स्टाफला ती नेमप्लेट काढण्याचे आदेश दिले होते. पण या नेमप्लेटच्या अशाप्रकारे गायब झाल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे.

सध्या शाहरुख अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतीच त्याच्या लाडक्या आर्यनला मुंबई क्रुझ ड्रग्ज केस प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे. त्यामुळे एक बाप म्हणून त्याच्या डोक्यावरचं मोठं संकट टळलं आहे आणि झालेली नामुष्की थोडीशी का होईना पण भरुन निघेल अशी आशाही त्याला वाटू लागली असेल. त्यात त्याच्या धाकट्या मुलाचा अबरामचा २७ मे रोजी वाढदिवस होता आणि याच दिवशी दोन छान गोष्टी घडल्या त्यामुळे मन्नतमध्ये सेलिब्रेशन करण्यात आलं,जे चर्चेत होतं. पण आता या नेमप्लेटच्या गायब झाल्याच्या बातमीनंतर चाहत्यांच्या मनाला नवीन घोर लागून राहिला होता. तो आता कारण कळल्यामुळे काहीसा कमी होईल हे मात्र खरंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT