Aryan Khan Esakal
मनोरंजन

Aryan Khan: 'बापामुळे इतकी प्रसिद्धी नाहीतर', आर्यन खानचा अ‍ॅटिट्यूड पाहून नेटकऱ्यांनी काढली इज्जतच..

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान हा सध्या त्याच्या पठाण चित्रपटामुळं चर्चेत आहे. मात्र शाहरुख खानचा लाडका मुलगा आर्यन खान हा काही काम न करताही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.कधी तो बॉलिवूडच्या पार्ट्यांना हजेरी लावतो.

कधी एअरपोर्टवर स्पॉट होतो. आर्यन खान नुकताच अनुराग कश्यपच्या 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावण्यासाठी पोहोचला होता. पण त्याचा अ‍ॅटिट्यूड पाहून युजर्सने चांगलंच ट्रोल केले आहे.

या व्हिडिओमध्ये आर्यन निळा-टी-शर्ट आणि जीन्स घातलेला स्क्रिनिंगमध्ये जाताना दिसला. त्याला फोटोग्राफर्सनी बोलवले तेव्हा तो सरळ आत गेला आणि स्क्रिनिंगमधून बाहेर आल्यावरही फोटोग्राफर्सनी त्याचे नाव पुकारले आणि त्याला फोटोसाठी थांबण्यास सांगितले पण त्याने त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि कारमध्ये बसला. त्याच हे वागणं पाहून युजर्स संतापले.

युजरने लिहिले की, “फक्त किंग खान शाहरुख मुळेच त्याला इतकी प्रसिद्धी आणि सन्मान मिळत आहे नाही तर कोणी विचारल नसत .” "तो खूप घमंडी वृत्तीचा आहे ... आणि मीडिया... तुम्हाला नेहमी त्याला का पकडायचे आहे हे माहित नाही. कृपया अशा असभ्य लोकांकडे दुर्लक्ष करा, “त्याचा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा तो थांबेल आणि पापाराझींसाठी पोज देईल.”

आर्यनची ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे नेटिझन्सच्या रडारवर येतो.

सगळ्यांना ठाऊक आहेच की, आर्यनला ॲक्टिंगमध्ये काहीही रस नाही. त्याला पडद्यामागे राहून काम करायचे आहे. नुकतीच त्याने एका सिनेमाची घोषणा केली होती. आर्यन दीर्घकाळापासून एका सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत होता. आता ते काम पूर्ण झाले आहे.  दरम्यान, शाहरुख आणि गौरी खानचा मोठा मुलगा आर्यन त्याच्या पालकांच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत लेखक म्हणून पदार्पण करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Ambad News : अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा नंबर 1 वर घडली दुर्दैवी घटना; तलावात पाय घसरून अकरा वर्षीय राजवीर राठोड याचा बुडून मृत्यू

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT