Shahapuri Saree Comes In Picture Through Tanhaji Film
Shahapuri Saree Comes In Picture Through Tanhaji Film 
मनोरंजन

तानाजी चित्रपटामुळे 'ही' साडी चर्चेत

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - देशात आणि जगात वेगवेगळ्या गोष्टींमुळे बेळगावची ठळक ओळख आहे. येथील जगप्रसिद्ध शहापूर साडीचे कधी काळी देशात तसेच विदेशातही नाव कमवले आहे. मात्र कालांतराने ती ओळख मागे पडली. १९८० च्या दशकात नावाजलेल्या या साडीने दूरदर्शन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. यामुळे बेळगावचे नाव चंदेरी दुनियेतही चमकले आहे. आता शहापूर म्हणजेच बेळगाव पॉलिस्टर म्हणून या साडीने आपली ओळख निर्माण केली. बदलत्या मार्केटिंगमुळे या साडीने आता आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न केला असला तरी आता या साडीला ‘तान्हाजी : दि अनसिग वॉरिअर’ या चित्रपटात मिरवण्याचा मान मिळाला आहे. यामुळे शहापुरी साडी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

तान्हाजी चित्रपटात महत्त्‍वाची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्री काजोलने शहापुरी साडी परिधान केली असून यामुळे शहापुरी साडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटातील पात्रे दाखविण्यासाठी पात्रांच्या वस्त्रांवर दिग्दर्शकाकडून अधिक लक्ष पुरविले जाते. चित्रपटात अभिनेत्री काजोल यांनी सावित्रीबाई मालसुरेंची भूमिका तर तानाजी मालसुरेंची भूमिका अजय देवगण यांनी साकारली आहे. त्यांच्याबरोबर अनेक दिग्गज कलाकारही काम करीत आहेत. 
शिवशाहीतील काळ दाखविण्यासाठी चित्रपटाचा सेट आणि वस्त्रालंकारांची मांडणी करण्यात आली आहे. यासाठी साधी पण, उठावदार असणारी शहापूर पॉलिस्टर साडी वापरण्यात आली असून त्याची खरेदी बेळगावातून करण्यात आली आहे. चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटात त्या त्या काळातील व्यक्‍तीरेखा जिवंत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत.

शहापुरातून साड्यांची खरेदी

चित्रपटातील काजोल यांच्या भूमिकेसाठी मराठमोळी साडी म्हणुन शहापूरी साडीची निवड करण्यात आली आहे. चित्रपटाचे वेशभूषाकार नचिकेत बर्वे यांनी काजोल यांची भूमिका जिवंत करण्यासाठी शहापुरातून साड्यांची खरेदी केली आहे. शहापूरची बाजारपेठ आदिलशाहीच्या काळात वसविण्यात आली. वडगाव, शहापूर, खासबाग परिसरात असणाऱ्या विणकर समाजाने पॉलिस्टर साड्यांचे उत्पादन घेत होते. या साड्या १९८० च्या दशकात लोकप्रिय राहिल्या आहेत. यामुळे बेळगावातील वस्त्रोद्योगाला इचलकरंजी (कोल्हापूर)च्या वस्त्रोद्योगापेक्षाही मागणी वाढू लागली. दूरदर्शनवरही या साड्यांना अधिक मागणी होती.

शहापुरी साड्या पुन्हा चर्चेत

पैठणी, कांचीपूरम, म्हैसूर सिल्क, बनारसी या साड्यांप्रमाणेच बेळगाव पॉलिस्टरही सरस होते, पण बाजारातील नवनव्या संकल्पनेमुळे ही साडी मागे पडली. आता पुन्हा ‘तान्हाजी’ चित्रपटामुळे व अभिनेत्री काजोलमुळे शहापुरी साड्या पुन्हा चर्चेत आल्‍या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT