Shahid Kapoor gets angry on Paparazzi at ruhaan kapoor and Manukriti Pahwa wedding  SAKAL
मनोरंजन

Shahid Kapoor: "वेड्यासारखा कशाला ओरडतोय??" नेहमी शांत असलेला शाहिद कपूर पापाराझींसमोर भडकला, व्हिडीओ व्हायरल

पापराझींनी असं काय केलं की शाहिद कपूरच्या तळपायाची आग मस्तकात गेली

Devendra Jadhav

Shahid Kapoor Viral Video News: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणजे शाहीद कपूर. जब वी मेट असो कबीर सिंग असो की पद्मावत, शाहीद प्रत्येक भुमिकेत स्वतःचं १०० % प्रामाणिकपणे काम करत असतो.

एरवी शाहिद कपूर कोणत्या बॉलिवूड पार्टीना, किंवा इव्हेंटला कमी दिसतो. याशिवाय तो विशेष कोणत्या वादात अडकत नाही. पण नुकताच शाहिदचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून शाहिद एकदम कबीर सिंग मोडमध्ये पापाराझींवर ओरडताना दिसतोय. काय झालं नेमकं पाहूया.

(Shahid Kapoor gets angry on Paparazzi)

शाहिदचा पारा सटकला अन्...

शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूत आणि कुटुंबासोबत २ सप्टेंबरला मुंबईत दिसला. भाऊ रुहान कपूर आणि मनुकृती पाहवाच्या लग्नासाठी शाहिद फॅमिलीसोबत उपस्थित होता.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, शाहिद जेव्हा विवाहस्थळी दाखल झाला तेव्हा मीडियाने पोझसाठी मोठ्याने त्याला हाक मारल्यानंतर शाहिद चिडलेला दिसला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शाहिदने पापाराझींना चांगलंच झापलं

आजुबाजूला पापाराझी आरडाओरड करत असल्याचं पाहून शाहिदचा संयम सुटला. त्याने चिडून पापाराझींना हळू बोलण्यास सांगितले. शाहिद म्हणतोय, “तू का ओरडतोय, मीच इथेच आहे ना? वेड्यासारखा कशाला ओरडतोय? मी गाडीत जाऊन बसलो तर ओरज. तुझ्या समोरच आहे मी. जरा रिलॅक्स." अशा शब्दात शाहिदने पापाराझींना चांगलेच सुनावले.

शाहिदने बायको आणि सासूला त्यांच्या गाडीत बसण्यास मदत केली. पुढे, तो पापाराझींसाठी पोझ देण्यासाठी मागे राहिला. याशिवाय काही चाहत्यांसोबत सुद्धा त्याने फोटो काढले. त्याच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी थांबलेल्या अनेकांशी त्याने हात मिळवले. शाहिदचा पापाराझींवरच्या रागाचं अनेकांनी समर्थन केलंय.

शाहिद कपूरचं वर्कफ्रंट

शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, शाहिद कपूर शेवटचा राज आणि डीकेच्या क्राईम थ्रिलर सिरिज 'फर्जी' याशिवाय 'ब्लडी डॅडी' या सिनेमांमध्ये दिसला होता. 

यापूर्वी त्याने 'जर्सी' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात काम केले होते, ज्यामध्ये त्याने क्रिकेटरची भूमिका केली होती. 

शाहिद कपूर 'उडता पंजाब', 'हैदर', 'जब वी मेट', 'पद्मावत' आणि 'इश्क विश्क' सारख्या अनेक चित्रपटांमधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT