mira rajput news
mira rajput news  Team esakal
मनोरंजन

शाहिदच्या 'मीराचा' नवीन लूक, ओठ पाहून चाहते 'हँग'

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं शाहिदनं (shahid kapoor) मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो. लॉकडाऊनच्या दरम्यान तो आणि त्याची पत्नी मीरा (mira rajput) यांनी वेगवेगळ्या व्हि़डिओच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे शाहिदच्या पत्नीनं मीरानं शेयर केलला लूक. त्या लूकमुळे चाहते चक्रावून गेले आहेत. मीराच्या ओठांचा फोटो इंस्टावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे ती ट्रोल होताना दिसत आहे. (shahid kapoor wife mira rajput lip fillers videos goes viral on internet yst88)

मीराच्या त्या फोटोनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या फोटोनं सोशल मीडियावर मीरा राजपूतच्या विरोधात वातावरण निर्मिती केली आहे. ज्याचा फटका शाहिदला बसण्याची शक्यता आहे. तिनं जो फोटो शेयर केला आहे त्यात तिचा चेहरा बदलेला दिसतो आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. शाहिदच्या बरोबरीनं मीरालाही सोशल मीडियावर मोठी फॉलोइंग आहे. ती फावल्या वेळेत सोशल मीडियावर चर्चेत असते. वेगवेगळे फोटो, व्हिडिओ शेयर करुन ती चाहत्यांना खुश करत असते.

मीराचा असाच एक हटके लूक इंस्टावर व्हायरल झाला आहे. त्यात तिनं आपल्या मोठ्या ओठांचा फोटो शेयर केला आहे. अर्थात तो लूक चाहत्यांना विशेष आवडलेला नाही. त्यामुळे त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ती वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशुट करत आहे. वास्तविक मीरानं कुठली लिप सर्जरी केलेली नाही. तर तिनं स्नॅपचॅटमधील एका फिल्टर्सचा वापर केला आहे.

मीराच्या त्या व्हिडिओमध्ये आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये, तो बात बन जाए नावाचे गाणे वाजत आहे. मीरानं गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या नव्या घराचा व्हिडिओ शेयर केला आहे. शाहिदच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तो जर्सी नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT