Shahid Kapoor's wife mira rajput reveals she was stopped at airport.. Instagram
मनोरंजन

Mira Rajput ला एअरपोर्टवर चेकिंगसाठी थांबवलं..मग बॅग तपासताना खो-खो हसू लागले सुरक्षारक्षक..वाचा किस्सा

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिनं सोशल मीडियावर शेअर केलेली इन्स्टा स्टोरी काही तासातच व्हायरल झाली अन् लागलीच चर्चा रंगली.

प्रणाली मोरे

Mira Rajput: शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते. मीराला चाहत्यांसोबत संवाद साधणं आणि स्वतःचे फोट शेअर करणं खूप आवडतं. नुकताच मीरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. ज्यात मीरानं एक फोटो पोस्ट करत सांगितलं आहे की कसं तिला एअरपोर्टवर सुरक्षा रक्षकानं थांबवलं. पण मग चेकिंग दरम्यान तिच्या बॅगमध्ये अशी एक गोष्ट सापडली की सुरक्षारक्षकालाही आपले हसून आवरेना.(Shahid Kapoor's wife mira rajput reveals she was stopped at airport..)

मीरा राजपूतने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक बंद बाटलीचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की,''मला एअरपोर्टवर घरचं बनवलेलं जेवण सोबत नेलं म्हणून थांबवलं गेलं. माझ्याकडे कोबी आणि कांद्याच्या पातीच्या भाजीपासून बनवलेलं लोणचं होतं. त्याला पाहिल्यावर लोकांना कळलं की मी पंजाबी आहे. त्यानंतर तिकडचे अधिकारी जोरजोरात हसू लागले आणि म्हणू लागले..लोणचं आहे बरणीत..जाऊ द्या''.

Shahid Kapoor's wife mira rajput reveals she was stopped at airport..

मीरा राजपूत-कपूर यंदाचा ख्रिसमस खूप उत्साहात साजरा करताना दिसतेय. ख्रिसमस निमित्तानं मीरानं शाहिद सोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की,''माझ्याकडून आणि माझ्या सांताकडून ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. आमची दोन्ही मुलं आपले गिफ्ट्स पाहण्यात बिझी आहे. मीरानं पोस्ट केलेल्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनीही कौतूकाचा वर्षाव केला होता''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT