suhana khan 
मनोरंजन

मुंबईहून न्युयॉर्कला रवाना झाली शाहरुखची लेक सुहाना खान

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई: शाहरुख खानसारखी त्याची मुलगी सुहाना खानदेखील चर्चेत असते. सुहानाचे फोटो देखील सध्या व्हायरल होत आहेत. सेलिब्रिटी किड्समध्ये सुहाना खूपंच प्रसिद्ध आहे. यावेळी सुहानाने बराच काळ कुटुंबासोबत राहिल्यानंतर आता न्युयॉर्कला परतली आहे. सुहाना खान न्युयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. तिचं कॉलेज आता सुरु झालं आहे. तिने सोशल मिडियावरुन याचे अपडेट्स दिले आहेत. तिने न्युयॉर्कमधील फोटो शेअर करत आहे. 

सुहाना खान तीन वर्षे ब्रिटन मध्ये शिक्षण घेतल्यावर सुहाना पुढील शिक्षणासाठी न्युयॉर्क येथे आहे. सुहाना अभिनयाचं प्रशिक्षण घेत आहे. सुहानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लायब्ररीचा फोटो शेअर करत लिहिललंय, 'हे क्युट होतं'. बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वीच सुहानाने चांगलं फॅन फॉलोइंग मिळवलं आहे. सुहाना दररोज तिचे फोटो शेअर करत असते आणि त्यांना हजारो लाईक मिळतात.

सुहानाचे इन्स्टाग्रामवर १५ लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या बॉलीवूड डेब्यूच्या बातम्या सतत येत असतात पण शाहरुखने शिक्षण पूर्ण केल्यावर मगच बॉलीवूडमध्ये येण्याचा सल्ला तिला दिला आहे. सुहाना तिनेच कॉलेजसाठी बनविलेल्या एका शॉर्टफिल्म मध्ये यापूर्वी दिसली होती. सुहाना तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे देखील चर्चेत असते. ती सावळी असली तरी तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. 

shahrukh khan daughter suhana khan returns to new york for study 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT